सातपूर : येथील ऊर्जा युवा फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्र. ९ मधील विविध भागांमध्ये गरीब नागरिकांना मोफत भाजीपाला वाटप केला जाता आहे. नगरसेवक दिनकर पाटील तसेच अमोल पाटील यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. यात धनंजय कसबे, विजय मांदळे, वैभव लभडे, ऋषीकेश लभडे, ज्ञानेश्वर पाटील, सचिन कुमावत, निखिल मोरे, ऋषीकेश आभाळे, प्रदीप शेटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी आहेत.
सातपूरला भाजीपाला वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:17 IST