‘जेसीआय’च्या वतीने ग्रेपसिटी विविध पुरस्कारांचे वितरण

By Admin | Updated: September 26, 2016 01:57 IST2016-09-26T01:56:37+5:302016-09-26T01:57:01+5:30

उपक्रम : विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव

Distribution of GrapCity awards to JCI | ‘जेसीआय’च्या वतीने ग्रेपसिटी विविध पुरस्कारांचे वितरण

‘जेसीआय’च्या वतीने ग्रेपसिटी विविध पुरस्कारांचे वितरण

नाशिक : जेसीआय ग्रेपसिटी नाशिक व जेसीआय ग्रेपसिटी क्विन्स नाशिकच्या वतीने आयोजित केलेल्या जेसी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात ग्रेपसिटी गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संघर्षातून यशस्वीतेकडे वाटचाल करणाऱ्या व नाशिकचा नावलौकिक वाढविणाऱ्या तरुणांसमोर असणाऱ्या आदर्श असणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
राजकीय क्षेत्रासाठी उपमहापौर गुरुमितसिंग बग्गा यांना, तर कलाक्षेत्रात स्वच्छता अभियानदूत चिन्मय उदगीरकर यांना तसेच नाशिक शहर हिरवाईने फुलवण्यासाठी प्रयत्नशील असणारे वृक्षमित्र शेखर गायकवाड यांना व क्रीडाक्षेत्रात नौकानयन दत्तू भोकनळ आदिंना ग्रेपसिटी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. जेसीआय ग्रेपसिटी नाशिक व जेसीआय ग्रेपसिटी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
नाशिक टॅलेंट सर्च या कार्यक्रमातून अनेक प्रतिभावंत कलावंत यांनी कलेचे प्रदर्शन केले. या जेसी सप्ताहाच्या सांगता समारोहासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआय इंडियाचे माजी उपाध्यक्ष वसंत खैरनार, तर जेसीआय ग्रेपसिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल पारख उपस्थित होते. यावेळी पराग घारपुरे, ज्योती रायचुरा, जेसीआय ग्रेपसिटीचे अध्यक्ष अजय चव्हाण, वैशाली पारख, पराग घारपुरे, ज्योती रायचुरा, प्रशांत पारख व सर्व पुरस्कारार्थी उपस्थित होते, असे जेसीआय ग्रेपसिटीचे अध्यक्ष जेसी अजय चव्हाण यांनी कळविले आहे.
 

Web Title: Distribution of GrapCity awards to JCI