सप्तशृंगगड : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने मोलमजुरी करणा-या ७० ते ८० कुटुंबांची उपासमार टाळण्यासाठी व्यापारी बांधवांकडून धान्याचे वाटप करण्यात आले.पंधरा दिवसांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची आर्थिक स्थिती पुर्णपणे ठप्प झाली आहे. मोलमजुरी करून गुजराण करणा-या वर्गाची कामेही ठप्प झाल्याने गडावरील ७० ते ८० कुटुंबांना अन्न धान्यांची गरज भासत आहे. आदिवासी बांधवांचे व गरजू लोकांचेही प्रचंड हाल होत आहेत. ही गरज ओलखून येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी वर्गाकडून प्रत्येक गरजू व्यक्तींच्या घरोघरी जाऊन गहु व धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय दुबे, योगेश कदम,माणिक सावंत, बंटी जहागिरदार, ईश्वर कदम तसेच मराठा महासंघाचे कार्यकर्ते अशोक चव्हाण, किशोर बेनके, बबलू बिन्नर, नवनाथ पाने, ठाकूर ,उपसरपंच राजेश गवळी आदी उपस्थित होते.
सप्तशृंगगडावर व्यापाऱ्यांकडून धान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:47 IST