शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त चर्चासत्र

By admin | Updated: December 13, 2015 22:04 IST

संयुक्त उपक्रम : अनेक मान्यवरांचा सहभाग

नाशिक : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभाग, एनबीटी लॉ कॉलेज आणि दिशा फाउंडेशनच्या वतीने जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव व वरिष्ठ न्यायाधीश व्ही. आर. अग्रवाल, एन.बी.टी. लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य, दिशा फाउंडेशनचे हेड आॅपरेशन अ‍ॅड. मिलिंद बाबर उपस्थित होते. याप्रसंगी अस्मिता वैद्य म्हणाल्या की, दिवसेंदिवस लोकांच्या समस्या वाढतच असून, न्यायालयात मोठ्या संख्येने खटले येत आहेत. त्यामुळे हजारोंच्या संख्येने प्रलंबित खटल्यांचे निकाल लागण्यासाठी खूप मोठा अवधी लागतो. जे दाखल होण्यापूर्वीच सामोपचाराने मिटविले जाऊ शकतात. यासाठी सर्वांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, तसेच सुरक्षित आयुष्य म्हणजे सुरक्षित मानवाधिकार होय. यावेळी अ‍ॅड. मिलिंद बाबर यांनी मानव अधिकार दिनाचे महत्त्व, तसेच मानव अधिकार दिन का साजरा केला जातो, याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
अ‍ॅड. सुवर्णा चिखलकर यांनी सांगितले की, मानव म्हणून जन्म घेतो त्यावेळेस त्याचे त्याला अधिकार मिळतात. स्वातंत्र, समता, विचार, व्यवसाय, नोकरी करण्याचा अधिकार प्रत्येकालाच दिलेला आहे. प्रत्येकाने आपले मूलभूत अधिकार जाणून घेणे असंघटित क्षेत्रातील लोकांनी एकत्रित होऊन न्याय मिळण्यासाठी दबाव आणणे गरजेचे आहे, असे विचार त्यांनी मांडले.
प्रा. सुनंदा काळे यांनी स्थलांतरित कामगार महिलांचे अधिकार यासंदर्भात माहिती दिली. तसेच हे अधिकार मिळवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम घेणे आवश्यक आहे व त्याच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करणे, तसेच राज्य पातळीवर कार्यक्रम घेणे गरजेचे आहे. कमिटी स्थापन करणे व असे करणे ही प्रत्येक व्यक्तीची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सुचविले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विभागाचे सचिव व वरिष्ठ न्यायाधीश अग्रवाल यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कशा प्रकारे सुरू करण्यात आले, यासंदर्भात माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण काळे यांनी केले. प्रा. एस. के. मांडवकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किरण काळे, रेखा साबळे, वैशाली तुंगार, किरण माळेकर, अमुल जोशी, प्रल्हाद जयकर, अजय खलाने, चंद्रकांत वाघेरे, संजय गवळी यांनी सहकार्य केले.