शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

झिरेपिंपळ येथे चर्चा : बांधकामाची परवानगी दिली कोणी?

By admin | Updated: July 30, 2014 00:17 IST

खासगी जागेत शासकीय इमारती

लोहोणेर : देवळा तालुक्यातील झिरेपिंपळ (विठेवाडी) येथील ३३१ या खासगी मालकीच्या गट नंबरमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा इमारत ७ ते ८ बेघर इमारत, पाच खासगी घरांसह एक अंगणवाडी आदि शासनाच्या अधिपत्याखालील इमारती व इमले उभे करण्यात आले असून, या खासगी जागेत शासकीय इमारत बांधकामांना कोणी परवानगी दिली. याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.झिरेपिंपळ शिवारातील गट नं. ३३१ हा खासगी ११ मालकीचा असून, यातील काही मालक मयत झाले आहेत, तर काही हयात आहेत. एकूण २ हेक्टर १२ गुंठे क्षेत्रफळ असलेला हा गटनंबर ५० वर्षांपासून बेवारस होता. या जागेवर ज्याच्या मनात येईल त्यांनी आपल्या मनमानी कारभाराने बांधकाम केले इतकेच नव्हेतर स्थानिक ग्रामपंचायतीने कोणत्याही कागदपत्रांची शहनिशा न करता ७ ते ८ इंदिरा आवास घरकुलांच्या बांधकामांना परवानगी दिल्याने या जागेवर बेघरांची बांधकामे करण्यात आली, तर जि. प.च्या इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या तीन खोल्यांची इमारतही उभी केली असून, चिमुकल्यांच्या शिक्षणांसाठी अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. काही खासगी घरांसह दोन पिठाच्या गिरण्याही या ठिकाणी सुरू आहेत. जर ही जागा खासगी मालकीची होती, तर या ठिकाणी करण्यात आलेली शाळा, बेघर वस्ती, अंगणवाडी इमारतीच्या बांधकामांना परवानगी दिली कोणी? हा प्रश्न उपस्थित राहत आहे.सद्यस्थितीला या जागेवर नव्याने अंगणवाडी इमारतीचे बांधकाम सुरू असून, त्याचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. मात्र उद्घाटनानंतर हे काम वादादीत ठरले असून, या बांधकामाला वेळोवेळी अडथळे निर्माण करण्यात येत आहे. यामुळे हे प्रकरण उघडकीस आले असून, यामुळे सदर जागेवरील मूळ मालक खडबडून जागे झाले आहेत. आपल्या खासगी मालकीच्या जागेवर शासकीय, शैक्षणिक इमारतींसह इतर खासगी बांधकामे झाल्याचे त्यांचे लक्षात येताच त्यांनी या जागेसंदर्भातील कागदपत्रांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. या वादादीत जागेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेसह अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आले असून, या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)