शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाविरोधात अविश्वास ठराव

By admin | Updated: February 23, 2016 23:05 IST

मोहेगाव : मनमानी कारभाराची सदस्यांची तक्रार

 मनमाड : मोहेगावच्या (ता. नांदगाव) सरपंच सत्यभामाबाई निवृत्ती काकळीज यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मंगळवारी (दि. २३) मंजूर करण्यात आला. विद्यमान सरपंच मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत सहा सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल दिला.मोहेगावच्या सरपंचपदी सत्यभामाबाई काकळीज यांची १६ आॅगस्ट २०१५ रोजी निवड करण्यात आली होती. सरपंच काकळीज या ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेत नाही तसेच मनमानी कारभार करतात या तक्रारीसह अविश्वास ठराव मांडण्यासाठी सहा सदस्यांनी १७ फेब्रुवारी रोजी तहसीलदार नांदगाव यांच्याकडे अर्ज दाखल केला होेता. त्याची दखल घेऊन तहसीलदार अनिल गवांदे यांच्या अध्यक्षतेखाली मोहेगाव ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी अ‍ॅड. अरुण गायकवाड, सुभाष हारदे, बाळू कलवर, सुरेखा भुसनर, वंदना गरुड, मंगलाबाई साळुंके या सहा सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्याच्या बाजूने मतदान केले, तर सत्यभामा काकळीज, सीताबाई भुसनर, शिवाजी मोरे यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले. तहसीलदार गवांदे यांनी ६ विरुद्ध ३ मतांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचे घोषित केले.यावेळी ग्रामसेवक ए. जे. गांगुर्डे, तलाठी संदीप सुरजुसे, बीट हवालदार दगू बारहाते, सुनील पैठणकर हे उपस्थित होते. दरम्यान, लवकरच मोहेगाव सरपंचपद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. (वार्ताहर)