शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

थेट नगराध्यक्षपदासाठी चुरस

By admin | Updated: November 13, 2016 23:06 IST

मनमाड : दोन अपक्षांसह आठ उमेदवार रिंगणात

गिरीश जोशी  मनमाडमाघारीनंतर मनमाड नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवारांची संख्या मोठी आहे. मनमाड पालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी ८ उमेदवार रिंंगणात असून, यामध्ये शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा, एमआयएमआयएम यासह दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.युती व आघाडीच्या चर्चा फिसकटल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काही ठिकाणी जागा वाटपाचा तिढा निर्माण झाल्याने युती व आघाडी होऊ शकली नाही. सर्वांनीच स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी दंड थोपटले आहेत.थेट नगराध्यक्षपदासाठी पद्मावती धात्रक (शिवसेना), हिना शेख (कॉँग्रेस), रुपाली पगारे (राष्ट्रवादी), कुसुम दराडे (भाजपा), सबिहा सोनावाला (एआयएमआयएम) सुजाता शिनगारे (बसपा), सुषमा तिवारी (अपक्ष), वैशाली दहीवले (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.मोठ्या संख्येने निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवार असल्याने राजकीय नेतेमंडळींना तिकीटवाटपासाठी तारेवरची कसरत करावी लागली. सर्व पक्षांनी उमेदवारांच्या मुलाखती घेताना त्याच्या आर्थिक स्थितीचा तसेच सामाजिक कार्याचा आढावा घेऊन उमेदवाऱ्या जाहीर केल्या. यामध्ये काही पक्षबदल केलेले उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उभ्या असलेल्या पद्मावती धात्रक या माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांच्या पत्नी असून, तीन वेळा मनमाड पालिकेचे नगराध्यक्ष असलेले गणेश धात्रक यांच्या त्या मातोश्री आहे. गेल्या वेळी धात्रक यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली असली तरी गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपाकडून उभ्या असलेल्या कुसुम दराडे या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दराडे यांच्या मातोश्री आहे. कॉँग्रेसकडून उभ्या असलेल्या हिना शेख या गेल्या १५ वर्षांपासून कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष असलेले अफजल शेख यांच्या स्नुषा आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या रुपाली पगारे यांनी पाच वर्ष नगरसेवकपदाची जबाबदारी सांभाळलेली असून राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजेंद्र पगारे यांच्या त्या पत्नी आहे. मनसेच्या माजी नगरसेवक सबिहा सोनावाला एमआयएमआयएमच्या उमेदवार आहेत. मनमाड बचाव समितीकडून पुरस्कृत करण्यात आलेल्या अपक्ष उमेदवार सुषमा तिवारी यांच्यासह सुजाता शिनगारे, वैशाली दहीवले यांनीही निवडणुकीत रंग भरला आहे.