दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: पंधरा फेऱ्या पूर्ण; भारती पवार यांची १ लाख ३५ हजार मतांनी आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 04:49 PM2019-05-23T16:49:29+5:302019-05-23T16:49:56+5:30

पंधराव्या फेरीनंतर ३लाख ७५ हजार ८५३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात २ लाख ४० हजार ११५ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते.

 Dindori Lok Sabha election results 2019: Fifteen rounds complete; Bharti Pawar's lead by one lakh 35 thousand votes | दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: पंधरा फेऱ्या पूर्ण; भारती पवार यांची १ लाख ३५ हजार मतांनी आघाडी

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: पंधरा फेऱ्या पूर्ण; भारती पवार यांची १ लाख ३५ हजार मतांनी आघाडी

Next
ठळक मुद्देपवार यांनी १लाख ३५ हजार ७३८ मतांनी आघाडी घेतली आहे.

दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले आहे. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होत आहे. तसे पाहिले तर भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार यंदा आयात केले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहतो की राष्ट्रवादीचा कब्जा होतो, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुस-या फेरीपासून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून पंधराव्या फेरीनंतर ३लाख ७५ हजार ८५३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात २ लाख ४० हजार ११५ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र त्यानंतर ते मोठ्या फरकाने मागे पडले ते दहाव्या फेरीपर्यंत. पवार यांनी १लाख ३५ हजार ७३८ मतांनी पंधराव्या फेरीअखेर आघाडी घेतली आहे. भारती पवार व महाले यांच्यामध्ये तब्बल एकूण १ लाख ३५ हजार ७३८ मतांचा फरक पडला आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये नाशिकपेक्षा अधिक ६५ टक्के इतके मतदान दिंडोरीत झाले. गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना ५ लाख ४२ हजार ७८४ मतं मिळाली होती, तर डॉ. भारती पवार यांना२ लाख ९५ हजार १६५ मतं मिळाली होती.
 

 

Web Title:  Dindori Lok Sabha election results 2019: Fifteen rounds complete; Bharti Pawar's lead by one lakh 35 thousand votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.