शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी लोकसभा निवडणूक निकाल 2019: तीसऱ्या फेरीत भारती पवार यांची मुसंडी; महाले यांना २९ हजार मतांनी टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 12:14 IST

दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. ...

ठळक मुद्देभारती पवार यांनी मुसंडी मारली; तीस-या फेरीत ७६,५१३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ४६,९४८ मतं पडली

दिंडोरी : गेल्या तीन निवडणुकीत भाजपाचा वरचष्मा राहिलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात यंदा भाजपाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉ. भारती पवार यांना रिंगणात उतरविले आहे. पवार यांची लढत माजी आमदार धनराज महाले यांच्याशी होत आहे. तसे पाहिले तर भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार यंदा आयात केले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात राहतो की राष्ट्रवादीचा कब्जा होतो, याकडे मतदारांचे लक्ष लागून आहे.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत दुसºया फेरीपासून फेरीनंतर भाजपाच्या डॉ. भारती पवार यांनी मुसंडी मारली असून तीस-या फेरीत ७६,५१३ मते मिळविली असून धनराज महाले यांच्या पारड्यात ४६,९४८ मतं पडली आहेत. पहिल्या फेरीत महाले आघाडीवर होते; मात्र त्यानंतर ते मोठ्या फरकाने मागे पडले आहेत. पवार यांनी २९ हजार ५६५ मतांनी आघाडी कायम टिकविली आहे.दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण सतरा लाखांहून अधिक मतदार असून, यंदाच्या निवडणुकीमध्ये नाशिकपेक्षा अधिक ६५ टक्के इतके मतदान दिंडोरीत झाले. गेल्या निवडणुकीत हरिश्चंद्र चव्हाण यांना ५ लाख ४२ हजार ७८४ मतं मिळाली होती, तर डॉ. भारती पवार यांना२ लाख ९५ हजार १६५ मतं मिळाली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNashikनाशिकdindori-pcदिंडोरी