दिंडोरीत जनजीवन विस्कळीत

By Admin | Updated: March 31, 2017 00:10 IST2017-03-31T00:09:43+5:302017-03-31T00:10:05+5:30

दिंडोरी : शहरासह तालुक्यात उष्णतेच्या तडाख्याने नागरिक हवालदिल झाले आहे.

Dindori life time disorder | दिंडोरीत जनजीवन विस्कळीत

दिंडोरीत जनजीवन विस्कळीत

 दिंडोरी : शहरासह तालुक्यात उष्णतेच्या तडाख्याने नागरिक हवालदिल झाले असून, मार्च महिन्यात प्रथमच एवढी उष्णता भडकल्याचे जाणकार सांगत असून, दुपारच्या कडक उन्हाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दिंडोरी शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड उष्णता असून, सकाळी १० पासूनच सूर्य आग ओकत असून, सायंकाळपर्यंत उन्हाचा तडाखा बसत आहे. कडक उन्हामुळे नागरिक दुपारी घराबाहेर पडत नाहीत. दुपारी सर्वत्र शुकशुकाट जाणवतो. उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी नागरिक थंड पेय, ऊस, फळांचा रस पिण्यासाठी गर्दी करत आहेत. उष्णतेचा शेतकामांवरही परिणाम झाला असून, शेतकऱ्यांना दुपारी काम बंद करावे लागत आहे. (वार्ताहर)

Web Title: Dindori life time disorder