शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘आदिती’ने साधला संवाद

By admin | Updated: November 14, 2015 22:14 IST

‘आदिती’ने साधला संवाद

इंदिरानगर : ऐसी लागी लगन, माउली माउली या आणि अशा सुश्राव्य गाण्यांनी गायक संगीतकार रोहन वरुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक हिंदी-मराठी गाण्यांसह अभंग आणि विविध भावगीतांच्या सादरीकरणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते इंदिरानगर येथील युनिक ग्रुपच्या वतीने आयोजित ‘मंगल प्रभात’ या पाडवा पहाट कार्यक्रमाचे.राजीवनगर येथील युनिक ग्रुप यांच्यातर्फे युनिक मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत आकाशी झेप घे रे पाखरा, खेळ मांडियेला वाळवंटी ठायी, उगवली शुक्राची चांदणी, मला वेड लागले प्रेमाचे, चिंब भिजलेले, धुंदीत राहू मस्तीत गाऊ, खंडेरायाच्या लग्नाला नवरी नटली, टीक टीक वाजते डोक्यात, नवराई माझी लाडाची लाडाची गं अशा अनेकविध गाण्यांचे सादरीकरण मंगल प्रभात या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने करण्यात आली. या कार्यक्रमात झी मराठी वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ मालिकेतील आदिती अर्थात सुरूची अडारकर या अभिनेत्रीची विशेष उपस्थिती लाभली होती. नगरसेवक सतीश सोनवणे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात परिसरातील श्रोते उपस्थित होते. (प्रतिनिधी)