शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभ्यासपूर्ण विवेचन

By admin | Updated: December 27, 2014 01:26 IST

देशात महाराष्ट्राला बनविणार रोलमॉडेल

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लोकमतच्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नाशिक’ या कॉफीटेबल बुकच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त नाशिक शहरात प्रथमच आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी खास गप्पांचा कार्यक्रम ‘लोकमत’च्या व्यासपीठावर खुलला आणि शेती, सिंचनापासून ते उद्योग, शिक्षणापर्यंत अनेकविध प्रश्नांना फडणवीस यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. प्रत्येक विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन करताना फडणवीस यांनी देशात महाराष्ट्र राज्याला रोलमॉडेल बनविण्याबाबतची आपली महत्त्वाकांक्षा स्पष्ट केली. हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये खास निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात फडणवीस यांची प्रगट मुलाखत लोकमतचे सहव्यवस्थापकीय व संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक दिनकर रायकर आणि नाशिक आवृत्तीचे संपादक हेमंत कुलकर्णी यांनी घेतली. संपादकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या माऱ्यापुढे जराही न डगमगता फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत यापुढे राज्य सरकारची नेमकी दिशा काय असेल, याचीही झलक दाखविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध प्रश्नांना दिलेली उत्तरे त्यांच्याच शब्दांत...शाश्वत शेती विकासावर भर
४सरकारचा फोकस आजवर केवळ रिलिफवर राहिलेला आहे. वातावरणातील बदल याचा मुकाबला आपण करतो आहे. मागील सरकारने पाच वर्षांत रिलिफपोटी ८ हजार कोटी रुपये, तर शाश्वत शेती विकासासाठी एक हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर नुकसानीपोटी आम्ही त्यांना एक दशांशदेखील मदत देऊ शकत नाही. माझ्या मते, रिलिफ हा मुद्दा आहेच परंतु शाश्वत शेतीविकासही महत्त्वाचा आहे. काही दिवसांपूर्वी राज्यात जी गारपीट झाली त्यात ज्या शेतकऱ्यांनी आच्छादने वापरली होती, त्यांचे नुकसान झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आच्छादनांबाबत मदतीचा विचार पुढे आला. परंतु सदर आच्छादने ही इटलीतून आयात केली जातात. त्यामुळे त्याचे आयातशुल्क कमी करता येईल काय, याचा विचार आम्ही करतो आहे. वातावरणातील बदल आता वास्तविकता मानून त्यापासून होणारा त्रास थांबविण्याचा विचार करायला हवा. महाराष्ट्रातील पाच हजार गावे एका वर्षात दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत संबंधित गावातील पाण्याचे आॅडिट करुन उपलब्ध पाणी कसे अडवता येईल, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. उपग्रहाच्या माध्यमातून पीकपाहणी करून नुकसानीचा अंदाज करता येईल काय, याचाही विचार सुरु आहे.