शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनाधिनता नष्ट करा

By admin | Updated: September 26, 2016 23:34 IST

विवेक घळसासी : साहित्य साधना मंडळाचे उद्घाटन

निफाड : श्री रामचंद्र प्रभूंची सर्वात मोठी ताकद म्हणजे सयंम आणि कर्तृत्व. आपल्यातील प्रत्येक जीव राम आहे असे समजून जीवनात संयम पाळा. एकादशीचा उपवास न करता त्या दिवशी मी टीव्ही पाहणार नाही. मी वाहन चालवणार नाही, मोबाइल वापरणार नाही अशा संकल्प केला तर तो उपवास होईल. सर्व साहित्यिक व कवींनी सांगितल्याप्रमाणे वृक्षांशी सुसंवाद साधा. सयंम, बंधन, मर्यादा या त्रिसूत्रीचा आधार घेऊन कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नका. आपले जीवन देवाला समर्पित करायचे असेल, माता-पित्यांची स्वप्ने पूर्ण करायची असेल तर आपले चारित्र निष्पाप फुलासारखे कोमल असले पाहिजे. पार्ट्या, वाढदिवस यात सहभागी होऊ नका. व्यसनावर विजय मिळविण्याचा पुरुषार्थ करा. म्हणजे आपोआपच व्यसनमुक्त भारत जगाला वंदनीय ठरेल, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले.निफाड येथील कर्मवीर गणपत दादा मोरे महाविद्यालयात साहित्य साधना मंडळाचे उद्घाटक म्हणून घळसासी बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. आर. एम. चिंतामणी, प्रा. माधव खालकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर कुलकर्णी, माधव सुरवाडे, संजय पाटोळे, रामनाथ आहेर, सोमनाथ मत्सागर, अनंत ताजणे, विष्णू मत्सागर आदि उपस्थित होते.साहित्य साधना मंडळाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की, युवकांनी कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये. युवक हा धरणाच्या भिंतीसारखा आहे. त्यास तडा गेल्यासे धरण फुटते आणि न भरून निघणारे नुकसान होते. युवकांनी तारु ण्यात ऊर्जा मिळवावी तरच देशाची अधिक प्रगती होईल, असे मत यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ म्हणाले की, अन्न, वस्त्र, निवारा याबरोबरच जीवनाला शिस्त हवी. वाचनाचे व्यसन लावा. भारतातील श्रेष्ठ साधूसंत म्हणजे थोर शास्त्रज्ञच आहे. त्यांच्या ग्रंथांचे अध्ययन करा. माता-पित्यास आनंद होईल अशा कृती करा. उघड्या डोळ्यांनी जगाकडे बघा. प्रभू रामचंद्राची भूमिका करून जीवन सुंदर बनवा. त्यासाठी चांगले वाचनाची सवय लावा, असे आवाहन रसाळ यांनी केले. यावेळी माधव खालकर, सुनीता उफाडे, अनिल दातार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)