शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात डेंग्यूचा कहर

By admin | Updated: November 13, 2016 22:43 IST

वीस रु ग्ण : आरोग्य विभागाची बैठक

निफाड : तालुक्यात डेंग्यूचे २० रुग्ण आढळले असून या पार्श्वभूमीवर निफाड पंचायत समितीत शनिवारी बत्तीस वर्षात प्रथमच पंचायत समितीचे पदाधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक होऊन तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढत चाललेली संख्या, दूषित पाणी तसेच दिंडोरी तास येथील बालकाच्या मृत्यू प्रकरणी वादळी चर्चा झाली.निफाड पंचायत समितीच्या झालेल्या या बैठकीस निफाड पंचायत समितीचे सभापती सुभाष कराड, गटविकास अधिकारी वैशाली रसाळ पं.स. सदस्य प्रकाश पाटील, बाळू हिले, तालुका वैद्यकीय अधिकारी चव्हाण, दिंडोरीतासचे सरपंच संदीप तासकर यांच्यासह तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दिंडोरीतास येथील प्रसाद लहांगे बालकाचा झालेल्या मृत्यू प्रकरणाबद्दल सरपंच संदीप तासकर यांनी वैद्यकीय अधिकारी आणि नर्स यांच्या विसंवादातून बालकाला आपला जीव गमवावा लागल्याचे सांगत दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली.तर निफाड तालुक्यात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, तालुक्यात डेंग्यूचा कहर वाढत आहे. आरोग्य यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगत कर्मचारीवर्गाला धारेवर  धरले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी चव्हाण यांनी याप्रसंगी सांगितले की, तालुक्यात डेंग्यूचे जवळपास वीस रुग्ण आहेत, तर काही रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार करतात. तेव्हा त्या दवाखान्याच्या डॉक्टरचे कर्तव्य आहे की, संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राला डेंग्यू रुग्णाबद्दल सूचित करणे परंतु सदर डॉक्टर तशी माहिती देत नाही़ यापुढे डेंग्यूबाबत डॉक्टर वा दवाखान्याने सूचित केले नाही तर संबंधित डॉक्टरला आरोग्य विभागाकडून नोटीस काढण्याचा इशारा चव्हाण यांनी दिला. याप्रसंगी गटविकास आधिकारी वैशाली रसाळ म्हणाल्या की, आरोग्य संदर्भातील तक्रारी वाढल्यामुळे आजची बैठक बोलविली आहे. आरोग्य विभाग आणि पदाधिकारी यांच्यात समन्वय असला पाहिजे़तालुक्यात पाणी दूषित असल्यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात. या बाबतीत गावातील पाणी नमुने घेऊन ग्रामपंचायतीने त्या संदर्भात आरोग्य विभागाला कळवावे. त्यानंतरही दखल घेतली नाही तर पंचायत समिती त्याबाबत कारवाई करेल. (वार्ताहर)