शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी तिसऱ्या सूचीची मागणी करा

By admin | Updated: August 2, 2014 01:26 IST

शिवाजीराव मोघे : सनदशीर मार्गाने लढा गरजेचा

आरक्षणासाठी तिसऱ्या सूचीची मागणी कराशिवाजीराव मोघे : सनदशीर मार्गाने लढा गरजेचानाशिक : आंदोलने करून आरक्षण मिळत नाही; त्याला सनदशीर मार्गानेच लढा द्यावा लागतो, असा अप्रत्यक्ष सल्ला सामाजिक न्याय व इतर मागासवर्गीय कल्याणमंत्री शिवाजीराव मोघे यांनी दिला. आरक्षण मिळविण्यासाठी तिसऱ्या सूचीची मागणी करण्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, विविध महामंडळांच्या निधीत आम्ही गेल्या दोन वर्षांत मोठी वाढ केली आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळाला ७५ कोटी रुपयांचे वाढीव भांडवल, रोहिदास महामंडळाला ७५ कोटी आणि महात्मा फुले महामंडळाला १५० कोटी रुपयांचे वाढीव भागभांडवल देण्यात आल्याचे ते म्हणाले. अपंग महामंडळाला शासनानेही मोठी गॅरंटी दिली असल्याने कर्जेही मोठ्या प्रमाणात देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. शिष्यवृत्ती योजनांमध्ये होत असलेल्या गोंधळांबाबत माहिती मिळाल्यानंतर सर्व प्रकारच्या शिष्यवृत्त्या आम्ही आॅनलाइन केल्या असून, त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसल्याचे दिसते आहे. सहा प्रकारच्या आॅनलाइन शिष्यवृत्त्यांमधून सुमारे ३२ लाख ३६ विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होत असल्याचे मोघे म्हणाले. याशिवाय इतरही समाजाच्या लाभार्थींना थेट लाभ मिळतील अशी योजना असल्याचे ते म्हणाले. जादूटोणाविरोधी विधेयकाबाबत बोलताना ते म्हणाले, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी असलेला विरोध आता कमी झाला आहे. सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मागणीबाबत ते म्हणाले की, केवळ आंदोलने करून आरक्षण मिळत नाही अथवा अनुसूचित जमातीत समावेश होत नाही. त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्यावा लागतो. आदिवासी समाजात समावेश व्हावा अशी जर मागणी असेल, तर त्यासाठी आधी केंद्र सरकारला प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यानंतर केंद्र सरकार आदिवासी संशोधन संस्थेला त्याबाबत माहिती देऊन संशोधन करायला सांगते. राज्य सरकारच्या अखत्यारित एक समिती नेमली जाते. त्यात आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी आणि आणखी काही सदस्यांचा समावेश असतो. त्या सर्वांच्या शिफारशीनंतर आदिवासी जमातीत समावेश होऊ शकतो. अनेक जमातींचे असे दावे फोल ठरले आहेत. त्यामुळे आरक्षणाचे फायदे मिळवायचे असतील तर तिसऱ्या सूचीची मागणी करा आणि त्यात समाविष्ट व्हा, असा सल्लाही त्यांनी दिला.