शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅप मशीनला मागणी

By admin | Updated: November 16, 2016 01:05 IST

पर्यायाची चाचपणी : दुकानदार, व्यावसायिकांकडून स्थानिक शाखांमध्ये अर्ज

नाशिक : केंद्र सरकारने मोठ्या नोटा चलनातून बाद करण्याच्या निर्णयाचा बाजारातील रोखीच्या व्यवहारांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे दुकानदार व्यावसायिकांकडून चलनी नोटांच्या पर्यायांची चाचपणी सुरू केली असून, अनेकांनी स्वॅप मशीन घेण्यासाठी बँकांकडे मागणी अर्ज के ला आहे. सद्यस्थितीत विविध बँकांचे अधिकारी ग्राहकांना नोटा बदलून देणे आणि ग्राहकांच्या इतर समस्यांमध्ये गुंतले असले तरी व्यवहार पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी स्वॅप मशीन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने अधिकाऱ्यांनी स्वॅप मशीन वितरित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. शहरातसह संपूर्ण जिल्हाभरात नोटांवरील बंदीमुळे सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण झाले असून, अगदी दोनशे तीनशे रुपयांचे व्यवहार करणेही अडचणीचे बनले आहे. अशा परिस्थिीतीत दुकानदार व्यावसायिकांचे काम बंद पडण्याची वेळ आली आहे. यावर मात करण्यासाठी दुकानदारांनी स्वॅप मशीनचा पर्याय निवडला आहे. सद्यस्थितीत डेबिट कार्डधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या खात्यावर पैसेही आहे; मात्र केवळ बँकेच्या रांगेत उभे राहून पैसे काढण्यात अडचणी येत असल्याने नागरिकांनी काही दिवस केवळ अतिआवश्यक व्यवहार करण्याचेच धोरण स्वीकारले आहे. स्वॅप मशीनद्वारे व्यवहार सुरू झाल्यास दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर येण्यास मदत होणार असल्याची व्यावसायिकांना अपेक्षा आहे. दरम्यान, बाजारात मोबाइल अ‍ॅप वापरण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला; मात्र अ‍ॅप वापरताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर आले असून, मोबाइल अ‍ॅप सर्वश्रुत नसल्याने या माध्यमातून व्यवहार करणे अवघड असल्याचे मत दुकानदारांनी व्यक्त केले. (प्र्रतिनिधी)