विखरणी उपकेंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी

By Admin | Updated: September 10, 2016 00:49 IST2016-09-10T00:49:39+5:302016-09-10T00:49:55+5:30

विखरणी उपकेंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी

The demand for starting discovery sub center immediately | विखरणी उपकेंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी

विखरणी उपकेंद्र त्वरित सुरु करण्याची मागणी

 येवला : विखरणी येथील तयार झालेले नवीन उपकेंद्र त्वरीत सुरु करण्याची मागणी शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांनी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे. विखरणी परिसरात वीज पुरवठा करण्यासाठी नवीन उपकेंद्र तयार करण्यात आले आहे. या उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून टेस्टिंग देखील झालेले आहे. हे उपकेंद्र सुरु झाल्याने परिसरातील वीजपुरवठा सुरु होऊन विजेचा लपंडाव थांबणार आहे, परंतु अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे उपकेंद्र सुरु होत नसल्याने परिसरातील नागरिकाची विजेअभावी मोठी परवड होत आहे. त्यामुळे विखरणी उपकेंद्र त्वरीत सुरु करावे अन्यथा १६ सप्टेंबर पासून उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: The demand for starting discovery sub center immediately