निवेदनात म्हटले आहे की, वजीरखेडेत पोल्ट्री फार्म आहे. त्यात ७० हजार पक्षी आहेत. त्या पक्ष्यांची कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. परिसरात मोठी दुर्गंधी पसरते. त्यामुळे रस्त्यावरून येणे-जाणे मुश्किल झाले आहे. सध्या सर्वत्र बर्ड फ्लूची साथ सुरू असल्याने शासनातर्फे राज्यात योग्य ती काळजी घेऊन पक्षी नामशेष केले जात आहेत. गावात बर्ड फ्लूमुळे मोठी दुर्घटना घडू शकते. पोल्ट्रीमुळे साथीचे आजार पसरल्यास अथवा जीवित हानी झाल्यास त्यास पोल्ट्रीचे संचालकच जबाबदार राहतील. वेळोवेळी संबंधितांना सूचना देऊन व तक्रारी करूनही दखल घेण्यात येत नाही. सरपंच आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष यांचेदेखील ऐकून घेतले जात नाही. पोल्ट्री बंद करण्याबाबत ग्रामसभेत ठरावदेखील करण्यात आला आहे. दुर्गंधीमुळे शेतात काम करण्यासाठी मजूरही मिळत नाहीत. पोल्ट्रीमुळे परिसरात डास, मच्छर, माशा वाढल्या असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. निवेदनावर निवृत्ती गायकवाड, पोपट निकम, परशराम निकम, शांताराम व्याळीज, कारभारी गायकवाड, अशोक शेवाळे, भाऊराव देवरे प्रकाश सोनवणे केदा वाघ, नानाजी कदम आदिंच्या सह्या आहेत.्रे
वजीरखेडेतील पोल्ट्री हलविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:17 IST