येवला : तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवी मंदिर भाविकांसाठी खुले करा, या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत, तहसीलदार प्रमोद हिले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांना भाजपच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.महाराष्ट्र शासनाने सर्वच प्रार्थना स्थळे, मंदिरे खुले केली असताना, प्रशासनाने कोटमगाव येथील श्री जगदंबा देवी मंदिर कोरोना संसर्गाच्या कारणाखाली बंद ठेवले आहे. यामुळे भाविक जगदंबेच्या दर्शनापासून वंचित राहत असल्याचे सदर निवेदनात म्हटले आहे.प्रशासनाने शासन विरोधी निर्णय तत्काळ मागे घेऊन सर्व भाविक-भक्तांसाठी श्री कोटमगाव येथील जगदंबा देवी मंदिर दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी करून, अन्यथा भाजप भक्तांसह आंदोलन करेल, असा इशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.निवेदनावर नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, गणेश शिंदे, भाजप शहराध्यक्ष तरंग गुजराथी, महिला मोर्चाच्या अनु मढे, सुनील काटवे, राजू परदेशी, प्रणव दीक्षित आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोटमगाव देवी मंदिर खुले करण्याची मागणीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2021 22:20 IST
येवला : तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवी मंदिर भाविकांसाठी खुले करा, या मागणीसाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत, तहसीलदार प्रमोद हिले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांना भाजपच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.
कोटमगाव देवी मंदिर खुले करण्याची मागणीसाठी
ठळक मुद्देभाविक जगदंबेच्या दर्शनापासून वंचित