मनमाड : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील देशी दारूचे दुकान त्वरित अन्यत्र हलवावे, अशी मागणी रिपाइंच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, गेल्या कित्येक वर्षांपासून महापुरुषांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचा प्रलंबित असलेला प्रश्न पूर्णत्वाकडे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे देशी दारूचे दुकान आहे. या दुकानामुळे येथे अनेक गैरप्रकार घडत असतात. बऱ्याच वेळा काही दारूडे पुतळा परिसरात ठाण मांडून बसत असतात. सदर दारू दुकानामुळे अनेक समस्या उदभवत आहे.तरी सदरचे दारूचे दुकान इतरत्र हलवण्यात यावे अन्यथा रिपाइंच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन यांच्यासह कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहे. (वार्ताहर)
देशी दारू दुकानाविरोधात कारवाईची रिपाइंची मागणी
By admin | Updated: March 31, 2016 23:19 IST
देशी दारू दुकानाविरोधात कारवाईची रिपाइंची मागणी
देशी दारू दुकानाविरोधात कारवाईची रिपाइंची मागणी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}