शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शिवजन्मोत्सव सोहळ्याबाबत दोन दिवसात निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST

नाशिक : नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ...

नाशिक : नाशिकमध्ये साजऱ्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवाच्या पारंपरिक मिरवणुकांबाबत दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मंडळांना दिले.

शिवजन्मोत्सवानिमित्त पारंपारिक मिरवणुकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करत परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी आज नाशिकमधील शिवजन्मोत्सव समिती व शहरातील विविध मंडळाच्या सदस्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सर्व मंडळ प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ उपस्थित होते. यावेळी छत्रपती सेना महाराष्ट्र राज्य, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती, नवीन नाशिक शिवजन्मोत्सव समिती, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, भाई समाज मित्र मंडळ, शिकसाई फ्रेंड सर्कल, लष्कर ए शिवबा, अशोकस्तंभ साईबाबा मित्र मंडळ, गजानन मित्र मंडळ, जुने नाशिक फ्रेंड सर्कल, शिवसेना प्रणित अर्जुन क्रीडा मंडळ, आत्मविश्वास व्यायामशाळा, गर्जना युवा प्रतिष्ठान, हिंदूसम्राट मित्र मंडळ, धर्मवीर ग्रुप सिडको, मराठा मित्र मंडळ सातपूर, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

या वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिरवणुकीस परवानगी मिळण्याबाबत अडचणी आहे. त्यामुळे सर्व मंडळांच्या वतीने यंदा १९ फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या नियमांचे पालन करून शासकीय तारखेनुसार जयंती साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करत शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये सध्या कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र पुन्हा कोरोना वाढणार नाही याची काळजी आपण सर्वांना घ्यावी लागणार आहे. त्या अनुषंगाने सर्व मंडळांनी प्रशासनास सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शिवजन्मोत्सव मिरवणुकीबाबत कोरोनाच्या नियमांचे पूर्णपणे पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा यासाठी येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना सांगितले.