मुदतवाढीचा निर्णय बेकायदा; मजदूर संघाचा आरोप

By Admin | Updated: July 22, 2014 00:51 IST2014-07-21T23:41:35+5:302014-07-22T00:51:15+5:30

मुदतवाढीचा निर्णय बेकायदा; मजदूर संघाचा आरोप

The decision of the extension is illegal; The allegations of the workers' union | मुदतवाढीचा निर्णय बेकायदा; मजदूर संघाचा आरोप

मुदतवाढीचा निर्णय बेकायदा; मजदूर संघाचा आरोप

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांस दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा जिल्हा बॅँकेच्या प्रशासकांचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस व सेवानिवृत्त कर्मचारी विजय मोगल यांनी केला आहे.
जिल्हा बॅँकेत झालेल्या भ्रष्टाचार व गैरव्यवहारांचा शोध घेऊन अनावश्यक खर्चाला आळा घालणे हे बॅँकेवर प्रशासकांच्या नियुक्तीचे कारण असताना प्रशासकांनी बॅँकेच्या खर्चात वाढ होईल,असे निर्णय घेणे अपेक्षित नाही. सुभाष देवरे नावाचे व्यवस्थापक व अन्य २२ अधिकारी ३१ मे २०१४ रोजी सेवानिवृत्त होत असताना केवळ देवरे यांना बॅँकेच्या सेवेत त्याच पदावर ठेवून अन्य अधिकाऱ्यांना सेवानिवृत्त केले गेले.
देवरे यांना मुदतवाढ द्यायचीच होती तर त्यांच्या निवृत्तीपूर्वीच त्याबाबत विषय रीतसर बॅँकेच्या प्रशासकीय मंडळाच्या सभेत घेऊन त्यास सहकार खात्याची मंजुरी घेणे आवश्यक असताना या नियमाचे पालन न करताच प्रशासकांनी स्वत:च्या अधिकारात सेवानिवृत्तीनंतरही देवरे यांना बॅँकेच्या सेवेत कायम ठेवल्याचा आरोप मोगल यांनी केला आहे.
ही मुदतवाढ प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अन्यायकारक असून, यासंदर्भात भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस विजय मोगल यांच्या नेतृत्वाखाली २३ जुलै रोजी प्रशासक मंडळाची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे मोगल यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The decision of the extension is illegal; The allegations of the workers' union