शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या खुनातून मुलगी मुक्त, आईची जन्मठेप कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 01:03 IST

नाशिक : सातपूर येथील दिलीप देवरे यांचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली पत्नी कमलाबाई देवरे आणि विवाहित मुलगी मंगला शिंदे यांच्या अपिलावर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने मुलीची खटल्यातून मुक्तता केली; मात्र पत्नीची शिक्षा कायम ठेवली आहे.

नाशिक : सातपूर येथील दिलीप देवरे यांचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली पत्नी कमलाबाई देवरे आणि विवाहित मुलगी मंगला शिंदे यांच्या अपिलावर उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने मुलीची खटल्यातून मुक्तता केली; मात्र पत्नीची शिक्षा कायम ठेवली आहे.सदरची घटना सातपूर येथे डिसेंबर २००६ मध्ये घडली होती. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. या खटल्याची सुनावणी नाशिकच्या सत्र न्यायालयात होऊन न्यायालयाने पत्नी कमलाबाई देवरे आणि मुलगी मंगला शिंदे यांना २०१३ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. सदर शिक्षेच्या विरोधात आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले असता, ॲड. अनिकेत निकम यांनी आरोपींची बाजू उच्च न्यायालयात मांडली. त्यात त्यांनी हा खटला परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे आणि पुराव्यांची साखळी सकृत्दर्शनी आरोपींचा गुन्हा सिद्ध करत नाही. ज्या दिवशी घटना घडली त्या रात्री मुलगी मंगला शिंदे ही घरात होती अशा स्वरूपाचा सबळ पुरावादेखील न्यायालयापुढे आला नाही. पुरावा नसताना मुलीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावणे बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करावी, असा युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाचे द्विसदस्यीय खंडपीठाचे न्यायमूर्ती साधना जाधव व नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून मुलगी मंगला शिंदे हिला निर्दोष मुक्त केले.

टॅग्स :Nashikनाशिक