शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

नृत्य स्पर्धेत विवाहितांचा जलवा

By admin | Updated: January 23, 2016 23:27 IST

ट्विस्ट टू डान्स : नवज्योती महिला मंडळाचा उपक्रम

नाशिक : संसारात रमलेल्या, परंतु आपल्यातील कलागुणांचे विस्मरण न होऊ देणाऱ्या विवाहित महिलांनी नृत्य स्पर्धेत आपला जलवा दाखविला. कुणी फ्यूजनवर ठेका धरला, तर कुणी सामाजिक संदेश देत स्पर्धेत रंग भरले. म्हसरूळ येथील नवज्योती महिला मंडळाने आयोजित केलल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. महाकवि कालिदास कलामंदिरात रंगलेल्या या अनोख्या नृत्य स्पर्धेचे उद्घाटन आमदार बाळासाहेब सानप, उपवनसंरक्षक अनिता पाटील आणि मिस इंटरनॅशनल वर्ल्ड वाइड क्विन नमिता कोहोक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी आमदार बाळासाहेब सानप यांनी म्हसरूळ परिसरात नवज्योती महिला मंडळाच्या कार्यालयासाठी इमारत बांधकामाकरिता आमदार निधीतून मदत करण्याची घोषणा केली, तर अनिता पाटील आणि नमिता कोहोक यांनी विवाहित महिलांच्या कलागुणांना संधी देणारे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. उद्घाटन सत्रानंतर जेनेनीस डान्स ग्रुप, पीएम रंगीला, पल्लवीज डान्स ग्रुप, सिक्स एन्जल, नवचैतन्या, शक्ती ग्रुप, हॅपी ग्रुप, रॉकस्टार ग्रुप, डायमंड क्वीन, रंगीला ग्रुप, नवदुर्गा महिला मंडळ, सुपर मॉम्स् गु्रप, डी-व्हायरस ग्रुप, यारिया ग्रुप, स्वयंसिद्धा आणि आदिशक्ती ग्रुपने विविध गीतांवर नृत्य सादर केले. स्पर्धेत व्यवसायाने शिक्षक, डॉक्टर असलेल्या महिलांही सहभागी झाल्या होत्या. परीक्षक म्हणून तमन्ना नायर, वृषाली चौधरी, स्वाती सोनगिरे यांनी काम पाहिले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. सूत्रसंचालन भूषण मटकरी यांनी केले. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्ष सुजाता कासलीवाल यांनी केले. भावना कासलीवाल यांनी आभार मानले. यावेळी स्वाती माडीवाले, शिवानी ओझरकर, प्रतीक्षा होशिंग, मंजूषा कुलकर्णी, सुषमा काला, भावना कासलीवाल, प्रतीक्षा नातू, सुषमा गांधी, सुजाता कुलकर्णी, संगीता बिटोडे, मंगला शेटे आदि उपस्थित होते. दरम्यान, या स्पर्धेत प्रथम पारितोषिक डी-व्हायरस ग्रुप, द्वितीय- डायमंड क्वीन, तृतीय- नवचैतन्य ग्रुप यांनी मिळविले. तर उत्तेजनार्थ पारितोषिक यारीया ग्रुपला देण्यात आले. (प्रतिनिधी)