शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाने द्राक्षबागांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 19:06 IST

गेल्या आठवड्यात झालेला परतीचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पंचाळे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

ठळक मुद्देपंचाळे परिसर : हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला

सिन्नर : गेल्या आठवड्यात झालेला परतीचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पंचाळे परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.सिन्नर तालुक्यातील सांगवी, सोमठाणे, दहीवडी या भागात द्राक्ष उत्पादक मोठ्या प्रमाणात आहे. डाळिंबबागांना मध्यंतरी तेल्या रोग आल्याने शेतकऱ्यांनी कमी पाणी लागते म्हणून हजारो एकरवर द्राक्षबागेची लागवड केली. सुरुवातीला एक महिना दुष्काळी स्थिती होती, मात्र नंतर अतिवृष्टी, परतीचा पाऊस व ढगाळ वातावरणामुळे थॉमसन, सोनाका, शरद क्लोन, सुधाकर आदी जातींच्या द्राक्षबागांवर वातावरणाचा गंभीर परिणाम झाला. सर्व द्राक्षबागांवर सड, कूज, तडतोडे पडून द्राक्ष पिकांचे नुकसान झाले आहे.या हंगामात एकरी द्राक्षबाग उत्पन्न घेण्यासाठी कमीत कमी तीन ते चार लाख रुपये खर्च झालेला आहे. यासाठी अनेक शेतकºयांनी बँक व खासगी सावकारांकडून कर्ज घेत बागा उभ्या केल्या आहेत. यंदा अस्मानी-सुलतानी संकट आल्याने शेतकºयांवर आत्महत्येची वेळ आली आहे. त्याचबरोबर खरीप हंगामातील बाजरी, मका, कांदा, सोयाबीन, भुईमूग, कांद्याच्या रोपांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत असून, भविष्यात काय? असा प्रश्न शेतकºयांना पडला आहे. त्यामुळे शासनाने सरसकट पिकांचे पंचनामे करून द्राक्ष बागायतदारांना एकरी चार लाख रुपये भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.यावर्षीच्या खरीप हंगामात इतर पिकांचा खर्च व उत्पन्नाचा हिशेब करून रोख स्वरूपात नुकसानभरपाई देण्याची मागणी सांगवी येथील संजय रायते, भागवत घुमरे, केशव मधुकर घुमरे, राजाराम घुमरे, संजय घुमरे, सोमठाणे येथील सोमनाथ कोकाटे, कुंतल कोकाटे, किरण कोकाटे, राहुल कोकाटे, दहीवडी येथील दिलीप आरोटे, मनोज गाडे, संजय गाडे, द्वारकानाथ गाडे आदी द्राक्ष बागायतदारांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती