रस्ते, पूल, नाले, फरशीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 06:29 PM2019-08-06T18:29:57+5:302019-08-06T18:30:29+5:30

कळवण तालुक्यातील आदीवासी , दुर्गम व अतिदुर्गम भागात जुलै अखेर व आॅगस्टच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात २७१० मिमी तर सरासरी ४५१ मिमी मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीपिकांचे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांची अवस्था दैयनीय झाली आहे.

Damage to roads, bridges, drains, floors | रस्ते, पूल, नाले, फरशीचे नुकसान

चणकापूर धरणातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग झाल्याने पुलावरु न पाणी गेल्याने पुलाचा वाहून गेलेला भराव.

googlenewsNext
ठळक मुद्देनुकसानीचे पंचनामे करून दुरूस्ती करा; जिल्हाधिकारी यांना निवेदन

कळवण : तालुक्यातील आदीवासी , दुर्गम व अतिदुर्गम भागात जुलै अखेर व आॅगस्टच्या पहिल्या टप्प्यात तालुक्यात २७१० मिमी तर सरासरी ४५१ मिमी मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीपिकांचे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्त्यांची अवस्था दैयनीय झाली आहे. तालुक्यात ४५०मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या शेतीचे नुकसान झाले, बांध फुटले, पूल व फरशीचे भराव वाहून गेल्याने लगत असलेल्या शेतकº्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या नुकसानीचे वस्तूनिष्ठ पंचनामे करु न शासकीय मदत तत्काळ द्यावी व तालुक्यातील रस्त्यांची दुरु स्ती करावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चणकापूर धरणातून सोडण्यात आलेल्या हजारो क्यूसेस पाण्यामुळे धरणाखालील पुलाचा भराव सुद्धा वाहून गेला. तालुक्यातील नदी नाल्यावरील पूल देखील भराव खचल्याने ते असुरिक्षत झाले आहे.
दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ यांसारख्या अस्मानी संकटांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना तालुक्यात झालेल्या पावसामुळे शेतकº्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे दिरंगाई न करता सरसकट पंचनामे करून सरकारने शेतकर्यांना मदत देऊन दिलासा द्यावा. नदी नाल्याना आलेल्या पूरामुळे शेतकर्यांच्या शेतीचे व शेतीपिकांचे तसेच पूल तुटल्याने व रस्ते वाहून गेल्याने लगतच्या शेतकर्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे.
साकोरे येथील बंधारयाचा भराव वाहून गेल्याने या बंधाºयाच्या खाली साकोरे येथील शेतकऱ्यांनी श्रमदानातून तयार केलेला रस्ता पुरामुळे वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतमाल घेऊन जाणे अवघड होऊन बसले आहे.
तालुक्यातील जनतेला दळणवळणासाठी रस्ते सुरिक्षत व सुरळीत करु न द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जयश्री पवार यांनी केली आहे. कळवण तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्ते मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी उध्वस्त झाले असून जागोजागी खड्डे पडल्याने दुरु स्ती करण्याची गरज बनली आहे. कळवण तालुक्यात राज्यमार्ग लांबी १२५ कि मी लांबीचा असून प्रमुख जिल्हा मार्ग लांबी८० कि मी लांबीचा आहे . या राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्ते मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी उध्वस्त झाले आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ आज जनतेवर येऊन ठेपली असल्याने या रस्त्यांची दुरु स्ती करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ जयश्री पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे.
पूरपाण्यामुळे गेला पुलाचा भराव वाहून
जिरवाडे गावाजवळील फरशी तुटली असून चणकापूर धरणाच्या खालील पुलाचा भराव पूरपाण्यामुळे वाहून गेला आहे.बंधारपाडा परिसरातील रस्ता खचल्याने एस टी बंद झाली असून १२गाव व पाड्यांचा संपर्क तुटला आहे.दरेगाव ते बिलवाडी बारीत दरड कोसळल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे.देसगाव ते हळदबर्ड रस्त्यावरील फरशी खचली आहे. सप्तश्रुंगगड - नांदुरी रस्ता पावसामुळे ढासळल्याने वाहतूकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ते उखडून गेले आहेत.

Web Title: Damage to roads, bridges, drains, floors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.