दादा भुसे यांचा मालेगावी जुगार अड्ड्यावर छापा

By Admin | Updated: January 23, 2016 23:47 IST2016-01-23T23:46:11+5:302016-01-23T23:47:06+5:30

दादा भुसे यांचा मालेगावी जुगार अड्ड्यावर छापा

Dada Bhusa's Malegaon gambling raid | दादा भुसे यांचा मालेगावी जुगार अड्ड्यावर छापा

दादा भुसे यांचा मालेगावी जुगार अड्ड्यावर छापा


मालेगाव : तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीसगाव चौफुली भागात मटक्याच्या अड्ड्यावर आणि पत्त्याच्या क्लबवर सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी छापा घालून रोख रकमेसह साहित्य जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सहकार राज्यमंत्री भुसे यांनीच या संदर्भात माहिती दिली. गेल्या महिनाभरापासून या भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनादेखील कारवाईचे साकडे घातले होते. मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी स्वत:च या विरोधात आवाज उठवत मटक्याच्या अड्ड्यावर छापा घातला. याठिकाणी रोख रकमेसह मटक्याचे साहित्य ताब्यात घेतले. सालीम अहमद साहेबखान व राजेश मांगूलाल मोरे यांना त्यांनी पकडून पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या ताब्यात दिले. यानंतर त्यांनी राजमाने रस्त्यावर असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा टाकला. मात्र येथील संशयित फरार झाले होते. येथील जुगाराचे साहित्य जप्त करून मोसमपूल येथे आणण्यात आले. तेथे रात्री उशिरापर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. छापा टाकण्यापूर्वी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना मोबाइल संदेशाद्वारे आणि प्रत्यक्ष बोलून या बाबतची माहिती दिल्याचे राज्यमंत्री भुसे यांनी सांगितले. या प्रकाराचे चित्रकरण करण्यात आले असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

Web Title: Dada Bhusa's Malegaon gambling raid