अनेक ठिकाणी रुग्णांना ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे प्राण गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ठिकठिकाणी जनजागृती तसेच सामाजिक संस्थांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीचे कार्य सुरूच आहे. आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने सामाजिक बांधीलकी या नात्याने नाठे यांनी दोन ऑक्सिजन सिलिंडर गावातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले. या मदतीबद्दल सरपंच सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांनी नाठे यांचे आभार मानले. मागील वर्षीदेखील नाठे यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी मदत केली होती.
फोटो -
गोंदे दुमाला येथील कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर भेट देताना रूपेश नाठे समवेत सरपंच शरद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव आदी.
===Photopath===
070521\07nsk_15_07052021_13.jpg
===Caption===
गोंदे दुमाला येथील कोरोनाबाधित रूग्णांसाठी ऑक्सीजन सिलेंडर भेट देतांना रूपेश नाठे. समवेत सरपंच शरद सोनवणे, ग्रामविकास अधिकारी विजयराज जाधव आदी.