शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात लवकरच सायबर पोलीस ठाणे

By admin | Updated: March 31, 2017 00:49 IST

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे.

 नाशिक : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आल्याने सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यादृष्टीने मुंबई, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये स्वतंत्र सायबर गुन्हे पोलीस ठाणे सुरू करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली.सिनिअर जर्नलिस्ट फोरमसोबत पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत शहरातील कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, सिग्नल यंत्रणा, गुन्ह्यांची उकल आदि मुद्द्यांवर सिंगल व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चर्चा केली. मुंबई, पाठोपाठ नाशिकमध्येही आर्थिक फसवणूक तसेच सोशल मीडियाच्या माध्यमांमधून विविध प्रकारचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हे अधिकाधिक उघडकीस आणण्याच्या उद्देशाने स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सिंगल म्हणाले. दरम्यान, वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त जयंत बजबळे यांनी वाहतूक व्यवस्थेसंदर्भात शहरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रम, मोहिमांची माहिती दिली. चर्चेमधून वाहतुकीच्या विविध समस्यांवर उपाययोजनांबाबत सूचना करण्यात आल्या. हेल्मेट वापरासंबंधीच्या जनजागृतीमुळे शहरातील निम्म्याहून अधिक लोक हेल्मेटचा वापर करत असल्याचे सिंगल म्हणाले. महिला विशेषत: महाविद्यालयीन तरुणींकडून मात्र विविध कारणे सांगून हेल्मेटचा वापर टाळला जात असल्याची बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली. सिंगल यांनी ही वस्तुस्थिती असल्याचे सांगून याबाबत महिला वाहतूक पोलिसांना विशेष सूचना देऊन नाकाबंदी दरम्यान तरुणींचे हेल्मेट वापरासंबंधी समुपदेशन करण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.