शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयाच्या वादात गमावला जीव; पानटपरीवर सिगारेट मागितली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 14:36 IST

पानटपरी चालकाच्या मारहाणीनंतर ग्राहकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Nashik Crime: नाशिक शहरातील सिडको परिसरातील छत्रपती संभाजी स्टेडियमजवळ असलेल्या एका पानटपरीच्या दुकानात आलेल्या इसमाने सिगारेट एक रुपयाच्या मागितल्यानंतर फरकामुळे दुकानदार व त्या ग्राहकात वाद झाले. यावेळी दुकानदाराकडून झालेल्या मारहाणीनंतर ग्राहकाचा उपचारानंतर घरी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर अंबड पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी दुकानदाराला ताब्यात घेतले आहे.

बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियमजवळ असलेल्या एका पान स्टॉलवर विशाल भालेराव (५०, रा, पाथर्डी फाटा) हा सिगारेट घेण्यासाठी आला होता. यावेळी सिगारेटच्या किमतीवरून भालेराव व दुकानदार संशयित बापू जगन्नाथ सोनवणे (५९, शिवपुरी चौक, सिडको) यांच्यात वाद झाले. त्याने सिगारेटचे अकरा रुपये मागितले परंतु भालेराव याने हे सिगारेट सर्वत्र दहा रुपयांना मिळते तुम्ही अकरा रुपयाला का विकतात असा जाब विचारला. त्याचा राग आल्याने दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढला आणि सोनवणे याने भालेरावच्या डोक्यात लाकडी दंडुक्याने प्रहार केला. यामुळे तो जबर जखमी झाला.याप्रकरणी अंबड पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत तपास करत कारवाई केली जात होती. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश हांडे यांनी सांगितले. किरकोळ पैशांवरून जीव गमवावा लागल्याने सिडको परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

मालकाने हलवले रुग्णालयात

जखमी अवस्थेत तो कामाच्या ठिकाणी गेला. तेथे त्याच्या मालकाचे रक्तस्त्रावाकडे लक्ष गेल्यानंतर त्यास खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. डोक्यावर झालेल्या जखमेमुळे त्यास तीन टाके पडले. यानंतर भालेराव घरी गेल्यानंतर संध्याकाळच्या सुमारस त्यास अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याची प्राथमिक तपासणी करून त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. शासकीय रुग्णालयात त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी तपासून मयत घोषित केले. 

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी