शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

रोगापेक्षा इलाज भयंकर

By admin | Updated: April 4, 2017 02:07 IST

विद्युत विभागाच्या वतीने दिवे कायमच चालू-बंद होत असल्याने एकीकडे मनपाकडून बचत केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

 नरेंद्र दंडगव्हाळ  सिडकोमहापालिका विद्युत विभागाच्या वतीने सिडको भागात विजेची बचत व्हावी, यासाठी काही भागांत टी-५ दिवे लावले आहेत. परंतु हे दिवे कायमच चालू-बंद होत असल्याने एकीकडे मनपाकडून बचत केली जात असल्याचे सांगितले जात असले तरी दुसरीकडे मात्र या दिव्यांच्या दुरुस्तीसाठीच अधिक खर्च होत असल्याने सध्या मनपाच्या विद्युत विभागाचे सुरू असलेले कामकाम म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असेच म्हणण्याची वेळ आली आहे.महापालिकेच्या सिडको विद्युत विभागाच्या वतीने प्रभाग २४, २५, २७, २८, २९ व ३१ आदि सहा प्रभागांचे कामकाम केले जात आहे. या सहा प्रभागात मिळून सुमारे १९ हजार पथदीप बसविण्यात आले आहेत. यात आजमितीला टी-५ (नळकांड्यांची फिटिंग असलेले) तीन ते चार हजाराच्या आसपास आहे. याव्यतिरिक्त १९ हजारांपैकी सुमारे १५ हजार पथदीप हे सोडियमचे दिवे असून अत्यंत कमी प्रमाणात एलईडी बसविण्यात आले आहेत. एकूणच मनपाचे वीज बचत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी सोडियम दिवे व टी-५ फिटिंगच्या देखभाल, दुरुस्तीमुळे खर्चात व परिणामी वीज बचत होत नसल्याचे दिसून येत आहे. टी-५ फिटिंग लावण्यामागे मनपाचा वीज बचतीचा उद्देश होता, परंतु या फिटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करावी लागत असल्याने वीज बचत होणे तर दूरच, परंतु यावरील खर्च वारंवार करावा लागत आहे, तसेच दुरुस्ती करण्यासाठीचे साहित्यही अनेकदा उपलब्ध होत नसल्याने रोगापेक्षा इलाजच भयंकर अशी मनपाची स्थिती झाल्याचे दिसून येत आहे.