अंगारकीनिमित्त भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:27 IST2019-09-17T22:47:19+5:302019-09-18T00:27:56+5:30

अंगारकी चतुर्थी निमित्ताने ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.

Crowds of devotees for the costume | अंगारकीनिमित्त भाविकांची गर्दी

अंगारकीनिमित्त भाविकांची गर्दी

लोहोणेर : अंगारकी चतुर्थी निमित्ताने ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरात भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिर परिसरात पेढे, फुले, हार, दुर्वा, फळे, नारळ, खेळणी, फराळाचे पदार्थ आदी लहान- मोठी दुकाने लावण्यात आली होती. पहाटे चार वाजता भाविकांसाठी दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले होते. बाप्पाच्या दर्शनासाठी काही भाविक पायी चालत आले. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने भाविकांची सोय व्हावी म्हणून फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. मंदिरासमोरील रस्त्यावर विक्रेत्यांनी गर्दी केली होती तर वाहनांची रांग लागली होती. यावेळी सटाणा पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळी उशिरापर्यंत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Web Title: Crowds of devotees for the costume