मालेगाव : तालुक्यातील हाताणे येथील ग्रामसेवक चतुर अशोक शिरसाठ यांनी ५०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन महिन्यांपूर्वी ३ जून २०१४ रोजी सटाणारोडवर असलेल्या गिरणा स्टील दुकानासमोर ही घटना घडली. नाशिक येथील लाच लुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक माधवी चौधरी यांनी फिर्याद दिली. शिरसाठ हे हाताणे गावचे ग्रामसेवक असताना त्यांनी तक्रारदार रवींद्र नेरकर रा. हाताणे यांच्या घरकुल योजनेंतर्गत मंजुर झालेल्या चौथ्या हप्तयाची रक्कम २५ हजार नगद पाठविण्याचा अहवाल मालेगाव पंचायत समितीत पाठविण्यासाठी त्यांच्याकडून ५०० रुपयांची लाच मागितली होती.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}