बोकटे परिसरात कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 07:29 PM2021-04-20T19:29:28+5:302021-04-21T00:36:27+5:30

अंदरसुल : येवला तालुक्यातील बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असल्याने मंगळवारी (दि २०) जि. प. प्रा. शाळेत पंचक्रोशीतील तिन्ही गावातील ४५ वयोगटापुढील ग्रामस्थांचे कोविड लसीकरण आणि कोरोना चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

Covid vaccination in Bokte area | बोकटे परिसरात कोविड लसीकरण

बोकटे परिसरात कोविड लसीकरण

Next
ठळक मुद्देग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन

अंदरसुल : येवला तालुक्यातील बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या वाढत असल्याने मंगळवारी (दि २०) जि. प. प्रा. शाळेत पंचक्रोशीतील तिन्ही गावातील ४५ वयोगटापुढील ग्रामस्थांचे कोविड लसीकरण आणि कोरोना चाचणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
बोकटेचे सरपंच प्रताप दाभाडे, दुगलगाव येथील सरपंच रावसाहेब लासुरे, देवळाने येथील सरपंच सागर गोसावी यांनी अंदरसुल येथील आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने या शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी महेंद्र काले, पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक पोलीन निरीक्षक रजपूत, पोलिस हवालदार पिसाळ, मोरे, पारधी, आरोग्य आधिकारी अंदरसुल डॉ. तारुर, पोलीस पाटील सुरेश दाभाडे, ग्रामसेवक भावराव मोरे, तलाठी अश्विनी शेंडे आदी उपस्थित होते. 

Web Title: Covid vaccination in Bokte area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.