शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Top Marathi News LIVE Updates: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
3
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
4
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
5
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
6
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
7
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
8
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
9
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
10
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
11
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
12
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
13
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
14
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
15
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
16
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
17
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
18
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
19
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
20
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला तोटा भरून देण्याची हमी महानगरपालिकेची नाही

By admin | Updated: January 6, 2017 00:41 IST

आयुक्तांची स्पष्टोक्ती : आचारसंहितेनंतरच निर्णय

नाशिक : राज्य मार्ग परिवहन महामंडळाने शहर बस वाहतूकसेवा चालविण्यास असमर्थता व्यक्त करत १०८ कोटी रुपयांच्या तोट्याची भरपाई द्या, अन्यथा १ फेबु्रवारीपासून बससेवा बंद करण्याचे पत्र महापालिकेला दिल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी, आता पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महामंडळाच्या पत्रावर निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. शहर बस चालविताना तोटा भरून देण्याची हमी महापालिकेने दिली नसल्याचेही सांगत आयुक्तांनी महामंडळाने दिलेला इशारा टोलवून लावला आहे.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी ३ जानेवारी २०१७ रोजी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून शहर बससेवा चालविण्याबाबत असमर्थता व्यक्त केली आहे. महापालिकेने गेल्या पाच वर्षांत झालेला १०८ कोटी रुपयांचा तोटा भरून न दिल्यास १ फेब्रुवारी २०१७ पासून शहर बससेवा बंद करण्यात येईल, असा इशाराही पत्रात देण्यात आला. महामंडळाने पाठविलेल्या या पत्राबाबत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, महामंडळाने पत्र पाठविले असले तरी आता पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे आणि येत्या काही दिवसांत महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे आचारसंहिता काळात राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. त्यामुळे, आचारसंहिता संपल्यानंतरच या विषयावर चर्चा करता येईल. मात्र, शहर बससेवा महामंडळामार्फत चालविली जात असताना त्यांचा तोटा भरून देण्याची हमी महापालिकेने दिलेली नाही. त्यामुळे भरपाईचा प्रश्न उद्भवत नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
दरम्यान, उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी महामंडळाने दिलेल्या इशाऱ्यासंबंधी बोलताना सांगितले, शहर बससेवा ही महापालिकेवर बंधनात्मक नाही तर ती ऐच्छिक आहे. बससेवा चालविण्याची महापालिकेची परिस्थिती नाही. जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुथ्थान अभियानांतर्गत महापालिकेला विचारणा झाली त्याचवेळी महापालिकेने एसटी महामंडळाला ना हरकत प्रमाणपत्र दिले. महामंडळाला बससेवा नीट चालविता आली नाही, हा त्यांचा दोष आहे. त्यांच्याकडून कोणत्या कायद्यान्वये महापालिकेकडे भरपाई मागितली जात आहे. त्यांनी त्यांच्या अडचणी सरकारपुढे मांडाव्यात. याउलट बसथांबे हे आमदार निधीतून उभारून देण्यात महापालिकेने महामंडळाला मदतच केली असल्याचे बग्गा यांनी स्पष्ट केले.