Coronavirus : दिलासादायक! नाशिकमध्ये आढळलेला पहिला कोरोनाबाधित पूर्णपणे झाला बरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 23:07 IST2020-04-11T23:03:05+5:302020-04-11T23:07:27+5:30
26 मार्च रोजी दाखल झालेल्या निफाडमधील संशयित रुग्णाचा अहवाल 28 मार्च रोजी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. अखेर रुग्णसुद्धा आता बरा झाला आहे.

Coronavirus : दिलासादायक! नाशिकमध्ये आढळलेला पहिला कोरोनाबाधित पूर्णपणे झाला बरा
नाशिक- नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सापडलेला पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण या आजारापासून आता बरा झाला आहे. त्याचा दुसरा अहवालही नकारात्मक आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. तसेच मालेगावचे अन्य प्रलंबित 3 अहवालही नकारात्मक आले आहेत. नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये आज एकही वाढीव कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. ही जमेची बाब ठरली आहे. नाशिकमध्ये सुरुवातीला एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. मात्र, 26 मार्च रोजी दाखल झालेल्या निफाडमधील संशयित रुग्णाचा अहवाल 28 मार्च रोजी पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. अखेर रुग्णसुद्धा आता बरा झाला आहे.