शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

दहा बंदीवानांना कोरोनाची बाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:14 IST

नाशिकरोड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आठ दिवसांपूर्वी आलेल्या वीसपैकी दहा कच्च्या कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे ...

नाशिकरोड : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आठ दिवसांपूर्वी आलेल्या वीसपैकी दहा कच्च्या कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघडकीस आले आहे.

वर्षभरापूर्वी देशात सर्वत्र कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने विशेष खबरदारी घेऊन योग्य नियोजन केल्याने अद्यापपर्यंत कारागृहामध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव होऊ शकला नाही.

कारागृहशेजारील के. एन. केला शाळेत नवीन आलेल्या कैद्यांना १४ दिवस ठेवल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून नंतरच कारागृहात सोडले जात होते. तीन महिन्यांपूर्वी कारागृह प्रशासनाने शाळेत सुरू केलेले तात्पुरते कारागृह बंद करून तेव्हापासून सर्व नवीन कैद्यांना कारागृहातच ठेवले जात आहे. कारागृहात नवीन आलेले कैदी अथवा न्यायालयीन कामकाजाकरिता नेण्यात आलेले कैदी यांना कारागृहात आणल्यानंतर स्वतंत्र बॅरिकेड्‌समध्ये १४ दिवस क्वारंटाईन ठेवले जात आहे.

न्यायालयात खटला सुरू असलेल्या कोपरगावच्या साठ कच्च्या कैद्यांना नगर, पुणे आणि नाशिकच्या कारागृहामध्ये दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले होते. नाशिकरोड कारागृहात आठ दिवसांपूर्वी वीस कैदी कोपरगाव येथून आले होते. त्यांची कारागृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यातील दहा कैद्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचे कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.

त्यामुळे पॉझिटिव्ह आलेल्या १० कच्च्या कैद्यांना कारागृहात असलेल्या कोरोना कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर कारागृहातील डॉ. ससाणे यांनी उपचार केले. पॉझिटिव्ह असलेल्या दहा कच्च्या कैद्यांची प्रकृती सुधारत असल्याचे कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी सांगितले.

दरम्यान, कारागृहाचे कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय स्वतःच्या घरी राहतात. त्यांचे कुटुंबीय अत्यावश्यक कामासाठी बाजारात जातात. सर्वत्र कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे बाहेर जाणारे कर्मचारी व कुटुंबीय कोरोनबाधित होऊ लागले आहेत. कर्मचारी आणि कैदी यांची कारागृहात प्रवेश करण्यापूर्वी दररोज तापमान नोंद, कोरोना टेस्ट याप्रमाणे वैद्यकीय तपासणी केली जाते. कैद्यांना कोर्टात प्रत्यक्ष न नेता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले जात आहे. कैदी व नातेवाइकांच्या गाठीभेटी बंद करून फक्त फोनवर संवादाला परवानगी देण्यात आली आहे.