शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे महापालिकेला ४५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 01:02 IST

नाशिक- कोरोना संकटाचा शासन आणि महापालिका सारख्या निमशासकिय संस्थांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेषत: उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेल्या घरपट्टी वसुलीसाठी सवलती देऊन देखील अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३५ कोटी रूपयांचा फटका बसल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देघरपट्टी: वसुलीत मोठी घट, भांडवली कामांना फटका

नाशिक- कोरोना संकटाचा शासन आणि महापालिका सारख्या निमशासकिय संस्थांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. विशेषत: उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असलेल्या घरपट्टी वसुलीसाठी सवलती देऊन देखील अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसून गतवर्षीच्या तुलनेत तब्बल ३५ कोटी रूपयांचा फटका बसल्याचे दिसत आहे.त्यामुळे महापालिकेसमोर आर्थिक अडचणी जाणवण्यास सुरूवात झाली आहे. विशेषत: भांडवली कामांवर त्याचा प्रतिकुल परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. जकात आणि एलबीटी संपल्यानंतर महापालिकेच्या दृष्टीने उत्पन्नाचा मोठा स्त्रोत म्हणून घरपट्टीकडे बघितले जाते. गेल्या दोन ते तीन वर्षात घरपट्टीचे उत्पन्न देखील वाढत असून तीनशे कोटी रूपयांच्या वर गेले आहे.गेल्या वर्षीच महापालिकेला नगररचना विभागाच्या विकास शुल्कात देखील मोठी वाढ झाली होती आणि तीनशे कोटी रूपयांहून अधिक उत्पन्न मिळाले होते. त्यमाुळे सारे काही आलबेल होते. मात्र कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडले आहे. दरवर्षी महापालिका आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर एप्रिल ते जून या तीन महिन्यात महापालिकेच्या देयकाची वाट न बघता घरपट्टी भरणा-यांना पाच ते दोन टक्के सवलत देते तसेच आॅनलाईन भरणा केल्यास आणखी एक टक्का सवलत देते याशिवाय सोलर वॉटर हिटर असेल तर आणखी पाच टक्के सवलत मिळते.त्यामुळे कमी मनुष्यबळात चांगली वसुली होते. परंतु यंदा मात्र सवलत कालवाधी वाढवून सुध्दा उपयोग झालेला नाही. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात९३ कोटी २२ लाख १६ हजार रूपयांची घरपट्टी वसूल झाली होती. चालू वर्षी मात्र नुकत्याच संपलेल्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ५८ कोटी ११ लाखरूपयांची घरपट्टी जमा झाली आहे. तर गेल्या वर्षी च्या तुलनेत पाणी पट्टीत दहा कोटी कमी वसुली झाली आहे. त्याचा विचार करता घरपट्टी आणि पाणी पट्टीत तब्बल ४५ कोटी रूपयांची घट आली आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे ठाकणार आहे.गेल्यावर्षी महापालिकेला घरपट्टीतून ९३ कोटी २२ लाख रूपयांचा महसुल मिळाला होता. यंदा फक्त ५८ कोटी ११ लाख रूपयांचाच महसूल मिळाला आहे. परंतु पाणी पट्टीत देखील अशीच घट झाली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत २३ कोटी ५ लाख रूपयांची पाणी पट्टी वसुल झाली आहे. यंदा मात्र याच कालावधीत १२ कोटी ७५ लाखांची वसुली झाली आहे. म्हणजेच सुमारे १० कोटी रूपयांची घट आली आहे.

 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या