शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मराठी विषयालाही कॉपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2016 00:27 IST

गैरमार्ग : जिल्ह्यात २०, तर विभागात २८ प्रकरणें

नाशिक : माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा मंगळवारपासून (दि. १) सुरू झाल्या. आज प्रथम भाषा म्हणून विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर दिला. दरम्यान, जिल्ह्यात वीस, तर विभागात २८ परीक्षार्थींनी कॉपीचा गैरमार्ग अवलंबला.दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून ९४ हजार १६९ परीक्षार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. विभागातील विद्यार्थ्यांची संख्या दोन लाख आठ हजार ६४० इतकी आहे. जिल्ह्यातील १८४ केंद्रे परीक्षार्थींसाठी मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. नेहमीप्रमाणे नाशिक विभागातील सर्वात कमी परीक्षार्थी नंदुरबार जिल्ह्यातून प्रविष्ट झाले आहेत. सर्वच केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी मंडळाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरीदेखील येवला तालुक्यातील पाटोदा केंद्र क्रमांक १६२० येथे दहा, कळवण तालुक्यातील मानूर केंद्रावर (क्रमांक १२७०) चार, १२५० केंद्रात चार आणि सुरगाणा केंद्रावर दोन अशा एकूण वीस परीक्षार्थींनी कॉपी करण्याचे धाडस तिसऱ्या डोळ्यादेखत केले. जिल्ह्याच्या भरारी पथकाने सदर केंद्रांवर अचानकपणे भेट देत कॉपीबहाद्दर शोधून काढल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांनी दिली. दहावीची परीक्षा सुरळीत पार पडावी व कॉपीसारख्या गैरमार्गापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करता यावे, यासाठी मंडळाकडून सर्वतोपरी प्रयत्न के ले जात आहेत. केंद्रांवरील पोलीस बंदोबस्तापासून तर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यापर्यंत तसेच भीत्तीपत्रे व शिक्षकांमार्फत प्रबोधनातूनही कॉपी रोखण्याचे प्रयत्न होत आहेत; मात्र तरीदेखील ग्रामीण भागातील काही संवेदनशील केंद्रांवर तसेच सामान्य केंद्रांवरही कॉपीचे प्रकार आढळून येत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. (प्रतिनिधी)