शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातून 30.48 टन कचरा संकलित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2015 00:05 IST

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

नाशिक : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे नाशिक शहर परिसरात रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता अभियान मोहिमेत शहरातील विविध प्रभागातून तब्बल ३०.४८ टन कचरा संकलित करण्यात आला.
डॉ. नानासाहेब प्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरातील ८५ पेक्षा जास्त शहरात सदर मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नाशिक शहराचाही समावेश होता. शहरातील या स्वच्छता मोहिमेसाठी शहरामध्ये सुमारे २७४९ स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रभागांमध्ये राबविण्यात आलेल्या या मोहिमेत २०६.३३ किलोमीटर रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. या व्यापक मोहिमेत ३०.४८ टन कचरा संकलित करण्यात येऊन तो कचरा डेपो येथे नेण्यात आला.
स्वच्छता मोहिमेंतर्गत नाशिक शहरातील त्रिमूर्ती चौक ते माउली लॉन्स, आयटीआय पूल ते एमआयडीसी आॅफिस, नाशिकरोड स्टेशन परिसर, शिवाजी पुतळा ते शालिमार, सैलानी बाबा बसथांबा ते विहितगाव जेलरोड परिसर, उत्तमनगर-पवननगर ते दिव्या अ‍ॅडलॅब थिएटर, शालिमार ते म्हसरूळगाव, सिडको पंडितनगर बसथांबा ते पाटीलनगर पेठे विद्यालय, वडाळा नाका ते गुरू गोविंदसिंग महाविद्यालय, पाथर्डी फाटा परिसर, आरटीओ कॉर्नर ते अशोकस्तंभ मखमलाबादरोड, अमृतधाम औरंगाबादरोड ते जुना आडगाव नाका हिरावाडी, गणेशवाडी ते नाग चौक, काळाराम मंदिर परिसर ते गोदाघाट, शुभम पार्क ते अंबड पोलीस स्टेशन-मुंबई महामार्ग, शुभम पार्क ते दिव्या अ‍ॅडलॅब थिएटर- अंबड लिंकरोड, अशोकस्तंभ ते आनंदवली.