शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

गावठाणात कॉँग्रेस आघाडीचा वरचष्मा

By admin | Updated: February 24, 2017 01:38 IST

भाजपाला बारा जागा : मनसे-कॉँग्रेस आघाडीचा पॅटर्न यशस्वी

संजय शहाणे  इंदिरानगरनाशिक पूर्व विभागातील गावठाणासह मुस्लीम बहुल भागात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह मनसेला सोबत घेऊन राबविलेल्या पॅटर्नने सेना-भाजपाला दणका दिला. पूर्व विभागातील २३ जागांपैकी १२ जागांवर भाजपाने यश संपादन केले, तर राष्ट्रवादीने ५, कॉँग्रेसने ४, मनसेने १ आणि अपक्षाने एक जागा जिंकली. या विभागात प्रामुख्याने, माजी महापौर यतिन वाघ यांच्यासह मनसेच्या मेधा साळवे, भाजपाचे कुणाल वाघ, सेनेच्या नंदिनी जाधव, राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले, अपक्ष रशिदा शेख व शिक्षण सभापती संजय चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला. नाशिक पूर्व विभागात प्रभाग क्रमांक १३, १४, १५, १६, २३ आणि ३० या सहा प्रभागांचा समावेश होता. सकाळी १० वाजता प्रभाग क्रमांक १३ ते १५ ची मतमोजणी शालिमारवरील महात्मा फुले कलादालनात तर प्रभाग १६, २३ आणि ३० ची मतमोजणी दीपालीनगर येथील शर्मा मंगल कार्यालयात सुरू झाली. पूर्व विभागात प्रामुख्याने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १३ मधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याठिकाणी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले माजी महापौर यतिन वाघ यांना पराभवाचे धनी व्हावे लागले.राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी वाघ यांचा २९९७ मतांनी पराभव केला. प्रभाग १३ मध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी आघाडी केली होती. या आघाडीने सेना-भाजपाला दणका दिला. प्रभाग १४ मध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार होते. परंतु, याठिकाणी राष्ट्रवादीने शोभा साबळे, समिना मेमन व जीन सुफीयान यांच्या रूपाने तीन जागा खिशात टाकल्या तर माजी नगरसेवक मुशीर सय्यद हे अपक्ष म्हणून निवडून आले. प्रभाग क्रमांक १५ मधील लढतीकडेही सर्वांचे लक्ष लागून होते. याठिकाणी माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते रिंगणात होते. त्यामुळे गिते यांच्या एकूणच राजकीय अस्तित्वाची मोठी लढाई होती. प्रभाग १५ मध्ये तीनही जागांवर भाजपाने यश संपादन केले. प्रथमेश गिते यांनी तीन विद्यमान नगरसेवक गुलजार कोकणी, संदीप लेनकर व शिवसेनेचे सचिन मराठे यांना धोबीपछाड दिली. प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे, कॉँग्रेसच्या आशा तडवी व नगरसेवक राहुल दिवे यांनी बाजी मारली. भाजपाचे अनिल ताजनपुरे यांनी विजय संपादन केला. प्रभाग २३ आणि ३० मध्ये भाजपाने सर्वच्या सर्व जागा खिशात टाकल्या. रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा, सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे यांनी विजयाला गवसणी घातली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शाहू खैरे यांच्या विजयानंतर भालेकर मैदानावर समर्थकांनी असा जल्लोष केला.