शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

लष्करी हद्दीलगतच्या निर्बंधांना न्यायालयात आव्हानमनपामुळे संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:42 PM

संजय पाठक/ नाशिक : शहरातील आर्टिलरी सेंटरपासून सुमारे पाचशे मीटर क्षेत्राच्या परिसरात नवीन बांधकामांना परवानगी नसल्याच्या कथित आदेशामुळे गोंधळाचे वातावरण असून, त्यामुळे शेकडो मिळकतींवरील बांधकामाच्या परवानग्या रखडल्या आहेत. मिळकतधारकांच्या मते आर्टिलरी सेंटरच्या परिसरात कोणतेही निर्बंध लागू नाहीत, तर मनपाच्या मते २०११ पूर्वीच्या आदेशाने निर्बंध कायम असल्याच्या दाव्यामुळे हा प्रकार घडला ...

संजय पाठक/ नाशिक : शहरातील आर्टिलरी सेंटरपासून सुमारे पाचशे मीटर क्षेत्राच्या परिसरात नवीन बांधकामांना परवानगी नसल्याच्या कथित आदेशामुळे गोंधळाचे वातावरण असून, त्यामुळे शेकडो मिळकतींवरील बांधकामाच्या परवानग्या रखडल्या आहेत. मिळकतधारकांच्या मते आर्टिलरी सेंटरच्या परिसरात कोणतेही निर्बंध लागू नाहीत, तर मनपाच्या मते २०११ पूर्वीच्या आदेशाने निर्बंध कायम असल्याच्या दाव्यामुळे हा प्रकार घडला आहे. दरम्यान, लष्करी हद्दीलगत मुळातच निर्बंध लागू होत नाहीत आणि लागू होत असतील तर वर्क आॅफ डिफेन्स अ‍ॅक्टनुसार मिळकतधारकांना भरपाई मिळावी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यांपासून हा घोळ कायम आहे. संरक्षण खात्याने देशभरातील लष्करी आस्थापनांच्या परिसरात खासगी बांधकामांना निर्बंधांबाबत २०११ मध्ये एक पत्रक जारी केले होते. त्यात लष्करी हद्दीपासून शंभर मीटर क्षेत्राच्या आत कोणतेही बांधकाम करायचे असेल तर त्यावर निर्बंध असतील. त्यासाठी प्राधिकृत यंत्रणेने परवानगी देताना संरक्षण खात्याच्या संबंधित क्षेत्रातील अधिकाºयाची परवानगी घेणे आवश्यक आहे, तर शंभर ते पाचशे मीटर क्षेत्रात बांधकाम होत असताना ते बांधकाम संरक्षण खात्याच्या दृष्टीने धोकादायक असेल तर लष्करी अधिकाºयांनी कमांडंटला कळवायचे, त्यांनी महापालिका आयुक्तांना कळवून हे बांधकाम रोखावे आणि त्यानंतरही आयुक्तांनी कारवाई न केल्यास आयुक्तांबाबत संरक्षण खात्याला कळवावे असे नमूद असून, या आदेशात सरसकट कुठेही बांधकामाला परवानगी नाकारलेली नाही. या पत्रामुळे गोंधळ झाल्यानंतर अनेक खासदारांनी संरक्षण खात्याकडे आक्षेप घेतले. त्यानुसार २०१६ मध्येदेखील संरक्षण खात्याने नवे पत्रक जारी केले. त्यात अनेक खासदारांच्या आक्षेपाचा संदर्भ दिला होता आणि निर्बंधाचे निराकारण करण्यासाठी लष्कराच्या आस्थापना असलेल्या दोन याद्या तयार केल्या. त्यातील पहिल्या यादीत १४५ ठिकाणांचा समावेश असून, त्यात लष्करी आस्थापनेपासून ५० मीटर क्षेत्रात बांधकाम निषिद्ध ठरविण्यात आले, तर उर्वरित ठिकाणी बांधकाम करता येईल, असे नमूद आहे. दुसºया यादीत १९३ ठिकाणांचा समावेश असून, त्यात लष्करी हद्दीपासून १० मीटर अंतरानंतर बांधकाम करता येईल असे नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणच्या यादीत नाशिक शहराचा समावेश नसल्याने नाशिकला कोणतेही निर्बंध नाहीत असे विकासकांचे म्हणणे आहे. परंतु महापालिकेच्या नगररचना खात्याचे अधिकारी हे मान्य करीत नसून २०११ पूर्वी असलेले निर्बंध कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.