शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने

By admin | Updated: March 7, 2015 01:18 IST

संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने

नाशिक : गोविंद पानसरे यांनी इतिहास हा सामान्य माणसांमुळे लिहिला गेला. हे सांगण्यास सुरुवात केली होती. इतिहास नेत्यांमुळे नव्हे तर सामान्य माणसांमुळेच लिहिला जातो. पानसरे यांनी नेमके तेच इतिहासातून सामान्य माणसाला मोठे करण्याबरोबरच आधुनिकतेची कास धरण्याचा सल्ला देण्याचे काम सुरू होते. त्यामुळेच पानसरे यांची हत्त्या ही आधुनिकतेला विरोध करणाऱ्यांनी केली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले.प. सा. नाट्यमंदिरात कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय व सामाजिक अत्याचार प्रतिबंधक कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संघर्ष सभा-सांस्कृतिक दहशतवादाची आव्हाने या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे, सीटूचे नेते डॉ. डी. एल. कराड आदि उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच गोविंद पानसरे यांची समाजवाद चळवळीवर भाष्य करणारी २० मिनिटांची प्रकट मुलाखत पडद्यावर दाखविण्यात आली. त्यानंतर प्रास्ताविकात डॉ. डी. एल. कराड यांनी सामाजिक चळवळींवर होणारे अत्याचार व हल्ले चिंताजनक असल्याचे सांगितले. त्यानंतर मार्गदर्शन करताना रावसाहेब कसबे म्हणाले की, अलीकडे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की धर्म नावाच्या गोष्टीला शेवटची घर घर लागली आहे. आधी दाभोलकर व आता पानसरे यांची हत्त्या ही अशाच सामाजिक चळवळ पुढे नेणाऱ्या क्रांतिकारी विचारवंतांची हत्त्या आहे. या हत्त्यांचा शेवटपर्यंत तपास लागणार नाही. कारण या हत्त्या अत्यंत जाणीवपूर्वक करण्यात आल्या आहेत. नरेंद्र मोदींनी हिंदुत्वाच्या नव्हे, तर ओबीसीच्या कार्डवर सत्ता मिळवली असून, त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांचा एक छुपा अजेंडा आहे, तो लोकांना कळेलच. ज्या विचारवंताने आयुष्यभर माणसावर प्रेम केले अशा विचारवंताची हत्त्या का व्हावी.? काय सांगत होते, पानसरे की ज्यामुळे त्यांची हत्त्या झाली. ते तुम्हा आम्हाला माहित नसलेला सत्य इतिहास सांगत होते, असे कसबे यांनी सांगितले. पानसरे यांनी डाव्या चळवळीला दलित चळवळीशी जोडण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी डावी चळवळ दलित चळवळीला जोडली जाईल, त्या दिवशी क्रांती होईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी उत्तम कांबळे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन महादेव खुडे, तर आभार प्रा. डॉ. विवेक खरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू देसले, दत्तू तुपे, संजय जाधव, सुनील मालुसरे, राजू नाईक आदिंनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)