शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गतवर्षीच्या तुलनेत कॉपीच्या प्रकारात झाली घट

By admin | Updated: April 3, 2017 01:37 IST

नाशिक : महाष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे.

नाशिक : महाष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले आहे. रागेल्या वर्षी बारावी परीक्षेत नाशिकमधून १३८ कॉपीची प्रकरणे समोर आली होती, तर यावर्षी केवळ ९४ विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याने नाशिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियनाच्या दिशेने टाकलेले हे यशस्वी पाऊल ठरले आहे.बारावीच्या परीक्षेसाठी विभागातील ६५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेसाठी, तर ७३,०२७ कला व वाणिज्य शाखेच्या २२,३९७ अशा एकूण एक लाख ६८ हजार २८७ विद्यार्थ्यांनी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या चार जिल्ह्यांतील ९५२ महाविद्यालयांतील २१८ केंद्रांवर परीक्षा दिली. या परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी शिक्षण विभागाच्या नऊ भरारी पथकांची यंदा परीक्षांवर करडी नजर होती. यात शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकाने नाशिकमधून २७, जळगावला २०, धुळे ४७ व नंदुरबारमध्ये केवळ एक असे विभागातून एकूण ९४ विद्यार्थ्यांना कॉपीच्या प्रकरणात पकडले आहे. गेला वर्षीच्या तुलनेत हा आकडा ३८ ने कमी आहे. गेल्या वर्षी मार्च २०१६ च्या बारावी परीक्षेत नाशिकमधून ५३, धुळे जिल्ह्यातून २२, जळगावमधून ५१ व नंदुरबारमधून ६ असे एकूण १३८ कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाने कारवाई केली होती. यावरून गेल्या वर्षीच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटले असून, कॉपीमुक्त अभिनाच्या दृष्टीने नाशिक शिक्षण मंडळाचीही यशस्वी वाटचाल असल्याचे मत शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)