शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध : पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 1:06 AM

मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळालेले असेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले़

ठळक मुद्देविद्यार्थी वसतिगृह उद्घाटन : १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल

नाशिक : मराठा समाजाला शंभर टक्के व कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण देण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग अहवाल सादर करणार आहे. अहवाल आल्यानंतर तत्काळ विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ठराव करून मराठा समाजाला १६ टक्के कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळालेले असेल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले़दिंडोरीरोडवरील मेरी वसाहतीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. ते म्हणाले की, मराठा समाजाला मिळणारे आरक्षण हे टिकणारे आरक्षण असणार आहे़ न्यायालयाच्या आदेशानुसार या आरक्षणासाठी आवश्यक असलेला मागासवर्ग आयोगाचा अहवाल वेळेत पूर्ण व्हावा यासाठी पुणे येथे सेवानिवृत्त न्यायाधीश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली वेगाने काम सुरू आहे.येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत हा अहवाल प्राप्त होणार असून यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन घेऊन १६ टक्के आरक्षण दिले जाणार आहे़ यासाठी सरकारने निर्धारित कार्यक्रम आखला आहे़मराठा समाजातील आठ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना ५० टक्के शैक्षणिक शुल्क माफ केले आहे़ तसेच प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी वसतिगृह उभारले जाणार असून कोल्हापूर, सांगली, नाशिक व औरंगाबाद याठिकाणी वसतिगृह सुरू झाले आहेत़ भाजपा सरकार मराठा आरक्षण देणार असल्याने विरोधकांची घालमेल सुरू झाली आहे़ मराठा आरक्षण हे राजकारणासाठी नाही तर जबाबदारी व बांधिलकी म्हणून देत असल्याचे पाटील यांनी सांगितले़प्रास्ताविक सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार जगताप याने केले. यावेळी महापौर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, अनिल कदम, डॉ. राहुल आहेर, माजी आमदार माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार, उपमहापौर प्रथमेश गिते, मनपा स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी आदींसह सकल मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार विनायक मेटे यांनी, मराठा आरक्षण, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्जासाठीच्या अडचणी दूर करण्याची मागणी केली़ तसेच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम २५ आॅक्टोबरपासून एल अ‍ॅण्ड टी कंपनी सुरू करणार असून, ते तीन वर्षांत पूर्णत्वास येणार असल्याचे मेटे म्हणाले़४आरक्षणाचा उपयोग हा शिक्षण व नोकरीसाठी होत असून, मराठा समाजाला आरक्षणानंतर मिळणाऱ्या सुविधा या आरक्षणापूर्वीच देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतलेला असल्याचे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.आणखी दोन इमारतीअधिग्रहित : महाजनजलसंपदा तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, या वसतिगृहात १३० विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली असून, आणखी दोन इमारती अधिग्रहित करून साडेतीनशे विद्यार्थ्यांची सोय केली जाणार आहे़ यामध्ये मुलींची संख्या १२५ असणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह असणार आहे़ मराठा समाजाचे आरक्षण हे भाजपा सरकार उशिरा सत्तेत आल्याने रखडले होते़ मात्र ही प्रक्रिया आता वेगाने सुरू असून, डिसेंबरअखेर मराठा समाजाला आरक्षण देण्याची ग्वाही दिली़

टॅग्स :NashikनाशिकmarathaमराठाChandrakant Dada Bachu Patilचंद्रकांतदादा बच्चू पाटील