शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही

By admin | Updated: August 3, 2014 02:00 IST

आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही

 

नाशिक : आगामी कुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी घेऊ दिल्या जाणार नाही अगदी भाड्यानेदेखील देणार नाही, असे सांगतानाच तपोवन परिसरातील शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही असा इशाराच दिला. शनिवारी दौऱ्यावर आलेल्या महंत ग्यानदासजी यांना त्यांनी साकडे घातले. त्यांनीही शेतकऱ्यांच्या बाजूनेच असल्याचे सांगत जमिनीची गरज भासली तर शेतकऱ्यांच्या संमतीनेच ती मिळवू असे सांगितले.कुंभमेळ्यासाठी ३२५ एकर जागा उपलब्ध केली जाणार आहे. त्यापैकी ५७ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून, उर्वरित जागेसाठी भूसंपादनाची तयारी सुरू झाली आहे. तथापि, शेतकऱ्यांचा त्यास विरोध आहे. शनिवारी साधू-महंत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यापूर्वीपासून उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्तकेल्या. यापूर्वी रामवाडी येथे साधुग्राम वसवले जात होते; परंतु ते आता तपोवनापर्यंत आले आहे. गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आणि त्यावर आता इमारती उभ्या राहिल्याने अन्य शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे मधुकर जेजूरकर यांनी सांगितले. साधुग्रामसाठी आरक्षण टाकताना माजी खासदार तसेच काही परप्रांतीय साधुंच्या आश्रमाच्या जागा वगळून शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनींवर आरक्षण टाकण्यात आले आहे. उदरनिर्वाहाचे साधन हटविण्याचा प्रयत्न कोणी सहन करणार नाही, असे सांगताना जेजूरकर यांनी आत्महत्त्या करू; परंतु जमिनी देणार नाही असे सांगितले. कुंभमेळ्यात तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या साधू-महंतांसाठी जागा आरक्षित केल्या जातात. साधुग्राम वसवताना त्यात गटारी, रस्ते, पाइपलाइन टाकण्यात येते. शौचालयांचे बांधकाम करण्यात येते. त्यामुळे कुंभमेळा संपल्यानंतरही शेतकऱ्यांच्या शेतात खडी, सीमेंट असल्याने तीन महिने पीक घेता येत नाही, त्यामुळे एक वर्ष शेतीचे भाडे राज्य शासनाने दिले तरी त्याचा उपयोग होत नाही असे त्यांनी सांगितले. शिवाजी गवळी यांनीही शेतकऱ्यांना दहापट टीडीआर देऊ असे सांगता सांगता प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारे मोबदला दिलेला नाही, असे सांगून जागा देण्यास विरोध केला. यावेळी महंत ग्यानदास यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी शेतजमिनी नकोच आहेत, गरज भासल्यास शेतकऱ्यांना विनंती करून त्यांच्या संमतीनेच जमिनी घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी एकनाथ गिते, प्रकाश शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, दामोदर जेजूरकर, रामदास जेजूरकर यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)