शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘रंग तुझ्या अंतरीचे’

By admin | Updated: September 29, 2016 00:21 IST

पुस्तक प्रकाशन : विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव

नाशिक : समृद्धी बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे डॉ. कविता बोंडे यांच्या ‘रंग तुझ्या अंतरीचे’ पुस्तकाचे डॉ. अर्चना ठोंबरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, मविप्रचे संचालक नाना महाले व डॉ. विलास बोंडे यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारक येथील समृद्धी संस्थेच्या महिला गुणगौरव सोहळ्यात ‘रंग तुझ्या अंतरीचे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाविषयी बोलताना कविता बोंडे म्हणाल्या, महिलांना वेगवेगळ्या परिस्थितीत आपले अस्तित्व सिद्ध करण्यासोबतच आपल्यातील प्रगल्भता आणि परिपक्वता दाखवून देण्याचे आव्हान असते. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असताना विविध स्त्रियांनी केलेल्या संघर्ष कथा या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला असून, पुस्तकातील कथा वास्तवाशी साधर्म्य असणाऱ्या असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार प्रदान करताना विशेष आनंद होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महिलांना दैनंदिन जीवनात विविध समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व समस्यांवर मात करून आणि कुटुंबासाठी पुरेसा वेळ देऊनही समाजाप्रती काम करणाऱ्या महिला सर्वांसाठी आदर्श निर्माण करीत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर डॉ. अर्चना ठोंबरे यांनी स्त्रियांना जन्मापासून ते वृद्धापकाळापर्यंत विविध अवस्थेत कराव्या लागणाऱ्या संघर्षाचे वर्णन केले. सूत्रसंचालन कविता बोंडे यांनी के ले. (प्रतिनिधी)