शहरात पाणीकपात होणार आजपासून रद्द?

By Admin | Updated: August 2, 2014 01:24 IST2014-08-02T00:21:38+5:302014-08-02T01:24:59+5:30

राजकारण : सभापतींची घोषणा; मात्र महापौर अनभिज्ञ

The city will be discontinued today from the water crisis? | शहरात पाणीकपात होणार आजपासून रद्द?

शहरात पाणीकपात होणार आजपासून रद्द?

नाशिक : शहरात सुरू असलेल्या पाणीकपातीवरून मनसेतच राजकारण सुरू झाल्याचे दिसू लागले आहे. धरणात पाणीसाठा वाढल्यानंंतर मनसेच्या शिष्टमंडळाने महापौरांना टाळून आयुक्तांची भेट घेतली. तसेच स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी शनिवारी (दि. २) पाणी कपात होईल, संपूर्ण शहरात एकवेळ परंतु मुबलक पुरवठा होईल, अशी घोषणा केली. परंतु महापौर अ‍ॅड. यतिन वाघ तसेच या निर्णयाची अंमलबजावणी करणारे पाणीपुरवठा विभागाचे खातेप्रमुख अनभिज्ञ आहेत.
पावसाने ओढ दिल्याने गंगापूर धरणात पाणीसाठा टिकवण्यासाठी महापालिकेने दोन महिन्यांपूर्वी शहरात पाण कपात लागू केली. शहरातील नाशिक पूर्व, पश्चिम, पंचवटी आणि नाशिकरोड विभागात एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला. त्यामाध्यमातून १५ टक्के पाणी कपात करण्यात आली. आता गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाचा जोर वाढला. गंगापूर धरण सुमारे ८० टक्के भरले.

Web Title: The city will be discontinued today from the water crisis?