शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा रस्त्यावर धावली शहर बस...

By admin | Updated: September 12, 2015 23:15 IST

अनवधान : बस दिसताच अनेकांच्या भुवया उंचावल्या

नाशिक : पालिका हद्दीतील वडाळागावात गेल्या पंधरा वर्षांपासून बससेवा बंद पडली आहे. मात्र, आज अचानकपणे दुपारच्या सुमारास वडाळागावच्या रस्त्यावरून शहर बस जात असल्याचे बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या.वडाळागाव हे पालिका हद्दीमधीलच. शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात पंधरा वर्षांपासून बंद पडलेली शहर बससेवा अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. हे एकमेव असे गाव आहे जेथे एस.टी. पोहोचलेली नाही. त्यामुळे नागरिकांबरोबरच विद्यार्थी वर्गाची दिवसेंदिवस मोठी गैरसोय होत आहे. मात्र महामंडळाला अद्याप या गावासाठी बससेवा सुरू करण्याचा ‘मुहूर्त’ मिळत नसल्याने कुंभमेळ्यामध्येही वडाळा बससेवेपासून वंचित होता. आज (दि.१२) दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास चक्क वडाळा रस्त्यावरून शहर बस गावाकडे येत असल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. नागजीमार्गे निमाणीवरून सुटलेली दुपारी बारा वाजेची पाथर्डीगाव बस ही वडाळा-इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावरून जाण्याऐवजी शिवाजीवाडी येथून वडाळा रस्त्याने थेट वडाळागाव चौफुलीपर्यंत आली. वाहनचालकाच्या अनवधानामुळे का होईना; मात्र अनेक वर्षांनंतर वडाळा रस्त्यावर यानिमित्ताने ग्रामस्थांना ‘एसटी’चे दर्शन घडले. (प्रतिनिधी)शहर बससेवेची उणीवगाव झपाट्याने विकसित झाले असून, एखाद्या महामार्गाला लाजवेल, असा या गावाचा रस्ता वर्षभरापूर्वी महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आला आहे. अशोका मार्ग कॉर्नरपासून तर थेट वडाळागाव परिसरापर्यंत नवनवीन कॉलन्या उदयास आल्या आहेत. लोकवस्ती वाढत आहे. वडाळागावाची लोकसंख्याही पंधरा वर्षांपूर्वीच्या तुलनेत साहजिकच वाढली आहे. त्यामुळे या गावाला शहर बससेवेची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून केले जात आहे.