शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
5
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
6
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
7
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
8
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
9
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
10
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
11
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
12
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
13
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
14
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
15
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
16
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
17
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
18
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
19
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
20
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील ३७ अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:36 IST

महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (दि.१४) सिडको विभागात धडक मोहीम राबवत १० प्रकरणांमधील तब्बल ३७ अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्क्या बांधकामांचा समावेश होता.

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (दि.१४) सिडको विभागात धडक मोहीम राबवत १० प्रकरणांमधील तब्बल ३७ अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त केली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्क्या बांधकामांचा समावेश होता.  महापालिकेच्या पथकाने पाथर्डी फाटा, प्रशांतनगर येथील चंद्रभागा सोसायटीमधील पी.जी. सुरेश कुमार यांचे पत्र्याचे शेड व लोखंडी जाळ्या, धनशेखर यांचे पत्र्याचे शेड व लोखंडी जाळ्या, गिरीश जोशी, महेश येवले, नवनाथ मोंढे, भावेश जाधव व गिरीश जोशी, साहेबराव साळुंखे आणि गणेश मोरे यांचे गाळ्यासमोरील शेड हटविण्यात आले. तसेच रविराज वाटिका बिल्डिंग, कामटवाडे येथील धामणे क्लासेस, तोरणानगर येथील त्रिनेत्र अपार्टमेंट येथील रसिद शेख तसेच शरद मोहन यांचे समोरील सामासिक अंतरातील शेड काढण्यात आले. बापू महादू शिलावट, शिवाजी पवार, बंडू बागुल यांचे समोरील सामासिक अंतरातील शेड काढण्यात आले. याशिवाय साईबाबानगर, एन. ४१ येथील प्रदीप पाटील तसेच लोकमान्यनगर, एन. ४२, त्रिमूर्ती चौक येथील २ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. हॉटेल ताज समोरील स्वस्तिक चेंबर येथील प्रशांत संघवी यांचे रस्त्यावरील २ प्रवेशद्वार, दुर्गानगर फ्रेशअप बेकरीमागे, अवनी अपार्टमेंट येथील ७ अनधिकृत बांधकामे, सिडको त्रिमूर्ती चौक येथील एन. ४५ मधील २ बांधकामे, पवननगर येथील शिंदे मेस समोरील पतंजली स्टोअर्स व राजश्री लॉटरी सेंटर येथील किरणसिंह पाटील यांचे अनधिकृत बांधकाम, आनंदनगर, पाथर्डी फाटा, श्यामदर्शन अपार्टमेंटमधील १ अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले.  गुरु कृपा सुपर मार्केट, राजहंस अपार्टमेंट, प्रशांतनगर येथील ५ अनधिकृत बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली. एकूण १० प्रकरणांमध्ये ३७ अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली.पोलीस बंदोबस्तात कारवाईमहापालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबविली. यावेळी अतिक्रमण विभागाची दोन पथके तैनात ठेवण्यात आली होती. सदर मोहीम विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, नगररचनाचे अभियंता सुभाष भामरे, सुशील शिंदे, मिरगणे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली. सदर बांधकाम हटविताना काही ठिकाणी रहिवाशांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु, पथकापुढे त्यांच्या विरोधाची मात्रा चालली नाही.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका